शिंदे समितीला ‘गॅझेटचा’ अहवाल फडणवीस देवू देत नाहीत - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- 9 hours ago
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी तत्कालीन शिंदे सरकारने गठीत केलेल्या शिंदे समिती मराठवाडा दौर्यावर आहे. काल बीड नंतर आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये समितीने कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समितीशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत टीकेची झोड उठवली.
मराठा आंदोलक जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, शिंदे समितीकडे आमच्या काहीच मागण्या नाहीत. शिंदे समिती ज्या कामासाठी नियुक्त करण्यात आली होती, ते काम चोखपणे पार पाडलं आहे. राज्यभरात जवळपास 58 लाख नोंदी शोधण्याचं काम शिंदे समितीने पार पाडलं आहे. शिंदे समितीला मुदत असताना देखील समितीला काम करू दिलं जात नाही, मराठा-कुणबी एकच असल्याचे 58 लाख नोंदीच्या पुराव्याचा अहवाल शिंदे समितीने सरकारकडे सपूर्द केला आहे.
छत्रपती संभाजीनगर चे तत्कालीन महसूल आयुक्त श्री. आर्दड यांच्याकाळातच गॅझेट वाचून झाले आहेत. सरकारने अद्याप पर्यंत शिंदे समितीकडून गॅझेटचा अहवाल का नाही मागवला? असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. आमच्या मागण्या सरकारकडे आहेत, त्यामुळे आमचां शिंदे समितीकडे काही काम मागण्या नाहीत. शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्याच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचं काम सरकारच्या महसूल कर्मचार्यांचे , ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत त्यांना व्हॅलेडिटी देण्याचं काम सरकारच्या कर्मचार्यांचे, मग शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र वाटप केले जात नाहीत, मंत्री सिरसाट यांच्या विभागाचे अधिकारी व्हॅलेडिटी देत नाहीत. त्यांना मंत्रालयातून रोखले जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
सरकारने नोंदीचा अहवाला स्विकारला त्यानंतर मराठा-कुणबी एक असल्याचा शासन निर्णय का नाही काढला. मराठा बांधवांवर लाखो खोट्या केसेस दाखल केल्या आहेत त्या मागे घेऊ म्हणले त्या का नाही मागे घेतल्या. आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्यांच्या वारसांच्या मदतीचा निधी रोखला, नोकर्या रोखल्या त्यांच्या, एवढा मराठ्यांविषय द्वेष मुख्यमंत्र्यांना असावा, शिंदे समिती आता पळतेय, गठीत कधी झाली 2 जूलै ला सहा महिण्याची मुदत वाढ दिली त्यानुसार. आजच कशी शिंदे समिती संभाजीनगरला आली?, आम्ही मुंबईला निघायच्या वेळेस आत्ताच कशी आली..? एवढ्या दिवसात का नाही आली. आम्हाला नादी लावायला, फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाहीत. फडणवीस साहेब तुम्हाला वाटत असेल चर्चा करा, मग शिंदे समिती समजून सांगेल.
म्हणजे मागण्या तुमच्याकडे अन् खापर शिंदे समितीवर फोडता काय?. फडणवीस साहेब शहाणे असताल, तर मराठा कुणबी एक आहेत, तीन्ही संस्थानचा गॅझेटचा अहवाल स्वीकारा आणि लागू करा. अन्यथा 27 ऑगस्ट नंतर आंतरवाली सोडली तर मी मागे हटत नसतो, कोण आडवं येतो त्याच्याकडे लोकशाही मार्गाने पाहून घेतो. आणि मराठ्यांना अवाहन आहे की आता लोकशाहीचे शस्त्र उपसावं लागतयं आणि मुंबईला यावचं लागतय असे अवाहनही जरांगे पाटील यांनी छत्रपतीसंभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना केले.
Comments