शिवतिर्थावरून फडणवीसांची ठाकरे बंधूंवर सडकून टीका ‘ लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत पोलखोल!
- Navnath Yewale
- Jan 12
- 1 min read

मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. यंदा पालिका निवडणुकीत मुंबई महानगपालिकेची निवडणुक केंद्रस्थानी आहे. मुंबई महापालिकेवर विजयी पताका फडकवण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत.
जोमाने प्रचार करून मुंबईकरांना आकर्षित करण्याची कसर प्रचारातून जराही सुटली जात नाही. दि. 11 जानेवारी रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली होती. आता याच सभेला उत्तर म्हणून शिवतीर्थावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर सभा झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला. विशेष म्हणजे फडणवीसांनी या सभेत राज ठाकरे यांच्याप्रमाणेच ‘ लाव रेत तो व्हिडीओ’ म्हणत ठकारे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवली.
महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आज स्वामी विवेकानंदाचची जयंती आहे. त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगात नेला. कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे. पण माझ्यासाठी तो संवाद असतो. काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावं लागतो. मी त्यांच्याच शब्दात सांगता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असलेले तसेच उद्धव ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करत असल्याचे दाखवण्यात आले. ठाकरे बंधूंची सत्तेसाठी बनवाबनवी चालू आहे, असे फडणवीस यांना या व्हिडिओतून दाखवायचे होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काहीही झालं तरी मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. तसेच कोणाचाही बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करता येणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सत्तेसाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.



Comments