top of page

शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत यांच्याकडून मदतीचा हात


जव्हार: शिवसेना तालुका प्रमुख  विनायक राऊत हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे व समाजाच्या हितासाठी कार्यरत असणारे नेते म्हणून परिचित आहेत.जव्हार तालुक्यातील मोर्चापाडा या गावामध्ये नुकत्याच आलेल्या मुसळधार पावसामुळे व वादळामुळे एका कुटुंबाचे घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. ही बाब . राऊत यांना समजताच त्यांनी विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली.पीडित कुटुंबाला त्यांनी तात्काळ नवीन पत्र्याची व्यवस्था करून दिली तसेच आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक ते सहकार्य केले.विनायक राऊत यांची ही तत्परता आणि समाजाभिमुख भूमिका स्थानिक पातळीवर सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.


      तरी या प्रसंगी विनायक राऊत, कासटवाडी सरपंच .कल्पेश विनायक राऊत, तालुका संघटक नामदेव खिरारी उपतालुका प्रमुख,.गणपत भोये, गट प्रमुख .किशन तुंबडा, विभाग प्रमुख पप्पू होळकर, युवासेना तालुका प्रमुख  राहुल शेंडे,युवासेना उपतालुकाप्रमुख,ग्राम.सदस्य, .कुणाल सापटा, ग्राम.सदस्य शंकर इल्हात, उपविभाग प्रमुख भालचंद्र शिंदे. व सुरेश भोये, .धर्मा चौधरी. व माजी सरपंच पिंटू अवतार व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments


bottom of page