शिवसेना म्हणजेच शिंदे गट; मंत्री उदय सामंतांनी केली नेत्यांची कानउघडणी, छत्रपती संभाजीगनरात आढावा बैठकीत पक्षाच्या कामावर उद्योगमंत्री सामंतांची नाराजी
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर: शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख, शिवसैनिकांच्या परिश्रमातून झालेली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गट तटाचे राजकारण न करता नेत्यांनी मनभेद बाजूला सारून पक्षवाढीच्या कामात योगदान देणे गरजेचे आहे. तिन्ही मतदारसंघात संघटनाबांधणीचे काम झालेले आहे. मात्र,व्यासपीठावरील नेत्यांनी कार्यकर्ता प्रमाणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत नेत्यांचे कान टोचण्याचे काम उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संभाजीगरात अयोजीत मेळाव्यात केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार पुनरीक्षण मोहीम आढावा घेण्याच्या उद्देशाने संत एकनाथ रंगमंदिरात पदाधिकार्यांचा माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. निवडणुक आयोगाने सुरू केलेली एसआयआर मोहिम, बीएलए नियुक्ती संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकार्यांच्या नियुक्त्या आदींचा आढावा धेण्यासाठी मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगरातील पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, संपर्कप्रमुख विलास पारकर, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, नगरसेवक त्र्यबंक तुपे, हर्ष शिरसाट उपस्थित होते. सामंत म्हणाले, शिवसेनेचा मेळावा म्हटलं की घोषणाबाजी आणि उत्साहाने भरलेला असतो, मात्र आजचा मेळावा तणापूर्ण वातावरणात पार पडला. याला शिवसैनिक आणि नेते जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले, तीन विधानसभा मतदारसंघात बीएलए नियुक्तीचे काम 25 ते 50 टक्केच झालेले आहे. तिन्ही मतदारसंघ मिळूनही शंभर टक्के काम होत नाही, असेही सामंत म्हणाले.
यावेळी शहरप्रमुख विश्वनाथ राजपूत, विजय वाघचौरे, शुभम काळे यांनी मतदारसंघातील कामाची माहिती सादर केली. एकाही मतदारसंघात 100 टक्के काम झाले अनसल्याचे ऐकून मंत्री सामंतांनी नाराजी व्यक्त केली. हे पक्षाचे काम आहे, सर्वांची सांधिक जबाबदारी आहे. मात्र आपण सर्व त्यास ‘ हलक्यात’ घेत आहात. 2 महिन्यात बीएल नेमणूकीचे काम 25 टक्के झाले आहे. साहेबांना काय सांगायचे..! असेही ते म्हणाले, खासदार भुमरे यांनी 15 दिवसांत 100 टक्के काम पूर्ण करण्याचा शब्द सर्वांच्या वतिने यावेळी दिली.
शेवाळेंनी सांगितली भाजपची पद्धत: माजी खासदार शेवाळे उपस्थितांना संबोधीत करताना म्हणाले की, भाजपमध्ये मतदारसंघात राहणारे व्यक्ती, मोदी, अमित शाह, हेसुद्धा मतदार यादीचे प्रमुख आहेत. ही सिस्टीम भाजपची आहे. ते जरी पदावर असले तरी मतदार यादीची जबाबदारी त्या प्रमुख नेत्यावर टाकलेली आहे. एसआयआर मोहिमेच्या कामाचा आढावा घेत असताना, पक्षातील पदाधिकार्यांच्या कामाच्या फेरतपासणीचा आढावा घेण्यात येत आहे, जे काम करणार नाही, त्यांची नावेही पदाकिधार्यांच्या यादीतून वगळले जाईल, अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे असंही शेवाळे म्हणाले.
शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत यांनी मध्य विधानसभा मतदारसंघात 320 बुथ असून 161 कव्हर केले, 234 बीएलए नेमले, अशी माहिती सादर केली, तर मंत्री सामंत यांनी त्यांची आकडेवारी खोडून काढली, आपल्या मतदारसंघात बीएलए नियुक्ती 234, एकूण बुथ कव्हर 161 आहेत. कव्हर न केलेल्या बुथची संख्या 159 आहे. तुमचा एकूण रिपोर्ट 50 टक्के असल्याचे सांगितले. त्यावर मतदारसंघात 100 बुथ हे पूर्ण मुस्लिम भागातील असल्याचे राजपूत म्हणाले. त्यावर एसआयआरचा मूळ उद्देश तोच आहे, मुस्लिम भागातच बांग्लादेशी, रोहिंग्यांची नावे असतात, आणि तीच आपल्याला रद्द करायची आहेत. ज्या भागातील संशयास्पद नावे वगळायची आहेत, तिथेच बीएलए नेमले नाही तर फायदा नाही असे म्हणतही त्यांनी कानउघडणी केली.



Comments