top of page

शिवसेना (शिंदे) गटात लवकरच फेरबदल; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार 3 ते 4 मंत्र्यांना मिळणार डच्चू?

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.लोकसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निपवडणुकीत पक्षाला मिळालेले यश- अपयश लक्षात घेऊन पक्षात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळेच एकनाथ शिंदे यांनी 4 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच त्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे. त्यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचे कळत आहे.


निवडणुकीत झालेला जय- पराजय लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी गावोगावी जाऊन आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. निवडणुकीमध्ये अपेक्षित यश का मिळाले नाही, कुठे कमी पडलो या सगळ्याची माहिती घ्यायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुक आणि पालिका निवडणुक ही शिंदे गटाच्या मंत्र्यासाठी प्रतिष्ठेची होती. त्यामुळे केवळ ताफा घेऊन फिरणार्‍या मंत्र्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार आणि नव्या चेहर्‍यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे


महापालिकेत मोठे अपयश : महापालिका निवडणुकीमध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागाला.

Comments


bottom of page