top of page

शिवसेनेचे मंत्री अडचणीत, एसआयटी स्थापन; रोहित पवारांकडून स्वागत

ree

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत बॅगभर पुरावे देखील दिले होते. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार आहेत. या निर्णयाच आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे.


राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच यामुळे पाठपुरवा करणारे स्थानिक भूमिपुत्र तसेच कॉन्शियस सिटीझन फोरम यांसारख्या समाजिक संघटनांचे यश आल्याचे राहित पवार यांनी सांगितले आहे.


आम्ही सादर केलेले तब्बल 12 हजार पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाचा उच्चाधिकार समितीने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करण्याबाबतचं लिहिलेलं पत्र आणि आता राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय अशाप्रकारे चोहुबाजूने मजबूत सापळा लागत आहे. परंतु मागील काळात वेगवेगळ्या प्रकरणात स्थापन झालेल्या एसआयटीचा इतिहास बघता केवळ वेळ मारून नेण्याचे प्रकार झाले आहेत. मात्र या प्रकरणात भ्रष्टाचारी मंत्र्याला कितीही संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही कोणत्याही भ्रष्ट मशाला या प्रकरणातून सूट देणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.

Comments


bottom of page