शुभांशू शुक्लाने इतिहास रचला; बनले अवकाशातील पहिले भारतीय शेतकरी
- Navnath Yewale
- Jul 10
- 1 min read

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला गेल्या 12 दिवसांपासून अॅक्सिओम -4 मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस) आहेत. 12 दिवसांच्या मुक्कामानंतर, शुभांशू शुक्ला आणि त्यांचे साथीदार 10 जूलैनंतर कधीही पृथ्वीवर परतू शकतात. फ्लोरिडा किनार्यावरील हवामान परिस्थितीनुसार, नासा (एनएएसए) लवकरच अंतराळ मोहिमेच्या अनडॉकिंगची तारीख जाहीर करणार आहे.
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळ केंद्रातील (आयएसएस) वर मूग आणि मेथीचे बियाणे वाढवले आहे. त्यांनी पेट्री डिशमध्ये अंकुरलेल्या बियांचे फोटो देखील काढले आहेत आणि ते (आयएसएस) वरील स्टोरेज फ्रिजरमध्ये ठेवले आहेत. हे अंतराळात केल्या जाणार्या संशोधनाचा एक भाग आहे, ज्यामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा उगवण आणि लवकर वनस्पतींच्या वाएीवर कसा परिणाम होतो हे पाहिले जात आहे.
ऑक्सिओम स्पेसच्या मुख्य शास्त्रश्र लुसी लो यांच्याशी झालेल्या संभाषणात शुभांशू शुक्ला म्हणाले की, मला खूप अभिमान आहे की, इस्त्रो देशभरातील राष्ट्रीय संस्थांशी सहयोग करू शकला आहे आणि काही उत्तम संशोधन करू शकला आहे. मी सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांसाठी स्टेशनवर हे काम करत आहे. हे रोमांचक आणि आनंददायी आहे.
Comments