शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; अजित दादांनी झापलं! आमदार रोहित पवारांचे धक्कादायक दावे, सांगितला बारामतीतील किस्सा
- Navnath Yewale
- Feb 12
- 2 min read

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अजितदादांचा मृत्यू हे अपघाती निधन असल्यापेक्षा घातपात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला असून याची चौकशी राष्ट्रीयस्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीज्कडून करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यानंतर, दिल्लीतही रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अपघाताच्या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, शेकडो कोटींच्या कंताटावरुन वाद विवाद झाल्याने उशीर झाल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. तसेच, बारामतीतही नरेश अरोरा यांच्या लोकांना दादांनी झापल्याचंही त्यांनी सांगितलं.
अजितदादा जर गाडीने गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती. त्यामुळे, काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत. फाईल मुद्दामहून आणली गेली का? दादांनी फाईलवर सही केली, त्यानंतर 7.13 वाजता विमानांचे बुकींग झाले. मी कोणावरही प्रश्न उपस्थित केले नाहीत, पण याचा तपास व्हावा , जे खरं आहे मी तिथे बोललो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारयांनी दिली.
27 ताखेला तटकरे म्हणताहेत की मी तिथे आलो उशीरापर्यंत थांबलो, एखद्या पॉलिटिकल कन्सल्टंटची तिथे चर्चा झाली. दादाकडून त्या व्यक्तीचे शेकडो कोटीचे कंत्राट रद्द केले जाणार होते, त्यावरुन वाद विवाद झाला म्हणून उशीर झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. आम्ही पुण्यात बारामती हॉस्टेलला बसलो होतो, तेव्हा नरेश अरोराच्या लोकांना दादांनी झापले होते. नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला पैसे द्यायला पाहीजे होते, असा काही नेत्यांचा आग्रह होता. कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे. असे म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटवरुन सुनिल तटकरेंकडे कंत्राटवरुन बोट दाखवले आहे.
दिल्लीला जाऊन मोदी-शाहांना भेटता आले नाही : सत्तेत नसतानाही अपघाताची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, मला वेळ मिळाली नाही, परंतु, ई-मेलच्या माध्यमातून पत्र लिहिणार आहे. विरोधात असतानाही आम्ही लढतोय, पण जे सत्तेत आहेत ते बोलत नाही. संसद सुरू असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, विमान उड्डाणमंत्री यांनी वेळ दिला नाही असं रोहित पवार म्हणाले. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, मोदी आणि अमित शाह यांना काकी भेटल्या, पार्थ जय होते. मी अपेक्षा करतो की राजकारण बाजूला ठेवून जो काही अपघात झालाय तो घातपात होता की अपघात होता हाच मुद्दा मांडला असावा. तपास यासाठी व्हायला पाहिजे की ब्लॅक बॉक्समध्ये काहीच मिळालं नाही.
रेकॉर्डिंग काहीच मिळालं नाही, अशी फालतू कारणं महाराष्ट्र ऐकणार नाही. अजित दादांचा घात झाला की अपघात झाला, याकडे नेत्यांचे लक्ष नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. यात क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने तपास व्हायला पाहिजे. ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही. पण, काहीजण म्हणत असतील की ब्लॅकबॉक्स बंद आहे, तर मी केलेल्या आरोपांवरप शिक्कामोर्तब केले असं होईल, अशीही भूमीका त्यांनी मांडली. डीजीसीएनं तपास सुरू केला आहे. परंतु एका महिन्यांत इंटरनॅशनल एजन्सीद्वारे तपास व्हावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.



Comments