top of page

शेतकर्‍यांसाठी सरकारची मोठी, ऐतिहासिक घोषणा शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफी, नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना आनुदान

मुंबई: राज्य सरकारने आज शेतकर्‍यांना दिलासा देणारी मोठी घेाषणा केली आहे. विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वकांक्षी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकित असणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून या योजनेचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ असे करण्यात आले आहे.


योजनेचे स्वरुप :

दोन लाखांपर्यंत कर्जमाफी: ज्या शेतकर्‍यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकित होते, अशा पात्र शेतकर्‍यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.


नियमित कर्ज फेडणार्‍यांसाठी आनुदान : जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्जबाजारीद शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून, शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था!

राज्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, “ आपण 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच, 2035 मध्ये राज्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी काही विशेष उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत, “ असेही त्यांनी स्पष्ट केले.”


दरम्यान शहरी आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष तरतूद केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. कृषी, उद्योग आणि सेवा या तिन्ही क्षेत्रांत संतुलित वाढ राखल्यानेच राज्याला 7.9 टक्क्यांचा विकास दर गाठणे शक्य होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments


bottom of page