श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या, डॉ. गौरी पालवे च्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
- Navnath Yewale
- Nov 24, 2025
- 1 min read

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईत राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. याप्रकरणी अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान आज डॉक्टर गौरी यांचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवेडे माहोज गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. योवळी पार्थिवासमोर गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडत‘ जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्य द्या. तुमची मुलगी गरीबाला द्या श्रीमंताच्या नादी लागू नका, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर गौरी यांचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
अनंत गर्जे यास अटक: डॉ. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे. या प्रकरणातील महत्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी विशेष तपास पथके कार्यरत झाली आहेत. त्यातच आता फॉरेन्सिक पथक आणि डॉक्टरांचे एक पथक हे अनंत गर्जेंच्या मुंबईतील घरी दाखल झाले आहे. अनंत गर्जे हे मुंबईतील वरळी परिसरातील बीडीडी चाळीत भाड्याने राहत होते. या गंभीर गुन्ह्याच्या तपासाचा एक भाग म्हणून महत्वाचे धागेदोरे आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ हे गर्जेच्या घराची झडती घेत आहेत. गौरी गर्जे यांनी नेमके कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली, याबद्दलचे महत्वपूर्ण धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहेत.



Comments