top of page

संगमनेरमध्ये किर्तनकाराच्या वक्तव्याने राजकिय आखडा तापला!

किर्तनकार भंडारेची जीभ घसरली; मामा- भाजांचा खताळांवर पलटवार


ree

संगमनेरमधील किर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. संग्राम भंडारे महाराज यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरांतवर टीका करताना जीभ घसरली आणि थेट नथूराम गोडसे होण्याची भाषा त्यांच्याकडून वापरण्यात आली.


भंडारे महाराज यांच्या भाषेवरून राज्यातील संपूर्ण काँग्रेस, थोरातांसाठी मैदानात उतरली आहे. तसेच थोरातांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी किर्तनकार संग्राम भंडारे महाराज यांना त्यांच्या उद्धटपणाला, आरसा दाखवत सुनावलं आहे.


दरम्यान आमदार सत्यजीत तांबे मामा थोरातांसोबत मैदानात येत, तथाकथित किर्तनकाराची टीका ही राजकीय तर आहेच, पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे, असे सुनावणरे ट्विट केलं आहे. सहकार, शिक्षण,कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याच्या काही घटना मागील काळात सातत्याने सुरू असल्याकडे देखील आमदार तांबेंनी लक्ष वेधलं.


सत्यतीत तांबे यांनी म्हटले आहे की, “ बाळासाहेब थोरातसाहेबांवर टीका करताना विरोधक सुद्धा जपून शब्द वापरतात. त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वत:ला किर्तनकार म्हणून घेणार्‍या एका उद्धट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही.”


सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याच्या घडत आहेत. तशा त्या सुरू करण्यात आल्या आहेत. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात साहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणार्‍या एका उद्योगपतीला त्याने ‘ होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याचे , बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली, याकडे देखील तांबेंनी लक्ष वेधलं.


संगमनेरची विकासाची वाटचाल सांगताना सत्यजीत तांबेंनी, ‘ संगमनेरच्या सहकारी व सहकारी बँकांमधील ठेवी आज 7000 कोटींच्याा घरात आहेत, संगमनेरात रोज 9 लाख लिटर दूध तयार होते, संगमनेरमधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज 7 लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो.


संगमनेरमध्ये 5 मेडिकल कॉलेज आहेत, ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत, म्हणजे येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून 25000 मुले- मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती, आता निळवंडे धरणातून 24 तास स्वच्छ पाणी मिळते असेही आमदार तांबे म्हणाले.

‘ हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम-सुफलाम झाला, यात स्वातंत्र्य सेनानी (कै.) भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे, जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टीका ही राजकीय तर, आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे, संगमनेरची जनता स्वाभिमानी जनता आहे हे कधीही सहन करणार नाही! असा इशाराही आमदार सत्यजीत तांबे यांनी दिला.


थोरात, खताळ यांच्यात वार पलटवार:

यावर आता बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांनी एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहेत. खताळ यांनी टीकेचा वार केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी जोरदार पलटवार केला.


दरम्यान बाळासाहेब थोरात यांना औरंगजेबाचा पुळका येत असेल तर त्यांचा डीएनए तपासावा लागेल, असं वक्तव्य आमदार अमोल खताळ यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांनी खताळ यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं आहे. डिएनए काय असतो ते अमोल खताळ यांना माहित देखील आहे का? त्यांच्याकडे बौद्धिक पातळी नाही, त्यामुळे कुणीतरी लिहून दिलेलं त्यांनी वाचलं असेल, असा खोचक टोला थोरात यांनी लगावला.


किर्तनात नेमकं काय घडल :

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे किर्तनकार संग्राम भंडारे हे औरंगजेब आणि अफजल खानाचे उदाहरण देत असल्याने बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी चालू किर्तनात गोंधळ घातल्याचा आरोप आमदार अमोल खताळ यांनी केला.


या प्रकारानंतर त्याच्या निषेधार्थ आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वात संगमनेर येथे काल हिंदुत्ववादी संघटनांनी रास्तारोको आंदोलन केलं. भाषणादरम्यान आमदार आमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांवर टीका करताना थेट त्यांचा डिएनए तपासण्यो वक्तव्य केले. आम्ही मामाला टेकवला, आता भाच्याला अर्थात आमदार सत्यजीत तांबे यांना देखील टेकवू, अशी टीका खताळ यांनी केली.

תגובות


bottom of page