संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ!
- Navnath Yewale
- Jul 30
- 1 min read
कोर्टाचं निरीक्ष; कटाचा सूत्रधार कराडच

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेस समोर आली आहे. न्यायालयाने वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. वाल्मीक कराड याने अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला.
वाल्मीक कराडवर असलेल्या गुन्ह्यांचा सुद्धा कोर्टात उल्लेख करण्यात आला. शिवाय वाल्मी कराडसह टोळीवर एकून 20 गुन्हे, यापैकीसात गंभीर गुन्हे मागण्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत. वाल्मी कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुध्दा आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
इतकंच नाहीतर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवदा एनर्जीच्या अधिकार्यांना धमक्या दिल्या होत्या. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रजचला आहे. तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टानं म्हटलं आहे.
दरम्यान, कोर्टाच्या या निरीक्षणामुळे वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसी संवाद साधताना कोर्टाच्या निरीक्षणावर समाधान व्यक्त करत हे परीक्षण आता आम्हला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि महामाहिम राष्ट्रपती पर्यंत कामाला येणार आहे.
देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हीसर्व त्यांच्या सोबत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी लावली आहे त्यामुळे यामध्ये आता अनेक बाबी समोर येणार असल्याचा दावाही आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
Comments