top of page

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवला?- खा. सोनवणे

ree

बीड: मस्साजोग (जि.बीड) चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला होता. मानवतेला काळीमा फासणार्‍या या घटनेने अनेकांचे काळीज पिळवटून निघाले. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा आरोपी जिवंत आहे की नाही असा सवाल विचारल्या जात आहे. दिवंगत सरपंच सतोष देशमुख यांच्या प्रथमपुण्यस्मरण दिनी उपस्थित मान्यवरांमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रकरणाच्या तपासाबाबत केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे .


बीडमध्ये राजकीय गुन्हेगारीचा क्रूर चेहरा राज्यासमोर आला. बीडमधील औष्णिक वीज केंद्रातील राखेसाठी हत्या, पवनचक्की कंत्राटातील हत्या एकामागून एक समोर आल्या. तर मस्साजोगचे सरपंच सतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुण हत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. समाजमन या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ पाहून सुन्न झाले. या हत्येतील सर्व पदाधिकारी हे राजकीय पक्षांनी संबंधित होते. काल संतोष देशमुख यांचा पहिला स्मृतीदिन झाला. त्यावेळी मनोज जरांगे, अंबादास दानवे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. त्यावेळी सोनवणे यांच्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे.


खासदार सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृहखात्याने तो थांबवला की अन्य कोणी थांबवला हे पाहिलं पाहिजे, त्यामुळे याप्रकरणी कुणाचा सारखा दबाव येतोय याची चर्चा होत आहे. या प्रकरणात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाचा तपास पूर्ण केला पाहिजे.या प्रकरणाचा तपासाला कॅप टाकली आहे ती कॅप काढा आणि तपास पुढे करा अशी मागणी त्यांनी केली.


धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा हे प्रश्न विचारण्याची का वेळ यावी जे सत्य आहे ते झालं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणाले. या प्रकरणाचा तपास थांबला पआहे हा तपास कोणी थांबवला आहे. तपास पुढे गेला पाहिजे. मी आज आरोप करणार नाही गृह खात्याने थांबवला की कोणी थांबवला हे बघितले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.


धस सत्तेच्या बाजूने आहेत. त्यांनी त्यांची बाजू मांडली त्यांचे समाधान झाले असेल. पण मी समाधानी नाही. मोकळ्या वातावरणात तपास करा शेवटच्या टोकापर्यंत जा. या प्रकरणात ज्यांनी आरोपींना पळून जायला साथ दिली त्यांना काय केलं साधी नोटीस तरी दिली का? असा सवाल सोनवणे यांनी केला.


या प्रकरणात अजितदादा, धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत का? मुख्यमंत्री आहेत हे बघितलं पाहिजे. लोकांच्या समस्या असल्यास की टोळीच्या समस्या असल्यास फोन येतो हे बघितलं पाहिजे. लोकांनी किती प्रेम केलं आहे हे नगरपालिका निवडणुकीत कळेल, असंही खासदार सोनवणे म्हणाले.

Comments


bottom of page