top of page

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धन्या मुंडेंना सहआरोपी करा - मनोज जरांगे

ree

बीड: संतोषभैय्या देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणार्‍यांची आठवण धन्या मुंडेला येते, यावरून या हत्या प्रकरणात त्याचाही हात असल्याचे एकप्रकारे त्याने कबुली दिली आहे. अशा लोकांना अजित पवार आणि त्यांचा पक्ष पाठीशी घालतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्याच्यावर कारवाई करत नाहीत. मग तुमचाही यात हात आहे का? अशी शंका उपस्थितीत होते. मराठा समाज शांत आहे, पण संतोषभैय्या देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मराठ्यांच्या मनात ज्वालामुखीसारखी आग आहे. संतोषभैय्याच्या हत्या प्रकरणात धन्या मुंडेला सह आरोपी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.


मस्साजोगचे दिवंगत सरपंच सतोष देशमखु यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि त्यानंतर झालेली निर्घुण हत्या या घटनेला काल (दि.29) एक वर्ष पूर्ण झाले. या पहिल्या पुण्यस्मरणाच्या दिवशी मस्साजोग येथे सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आवर्जुन हजेरी लावली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली . बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही दिली. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत समाज त्यांना वार्‍यावर सोडणार नाही.


एका कुटुंबाचा आधार गेला, संतोषभैय्या दुशमुख यांच्या मुलांना आज वर्ष झाले घरात बाप दिसत नाही अन् त्यांचे खूनी, त्यांना आश्रय देणारे भाषण ठोकतात, निर्घुण हत्या करणार्‍यांची आठवण काढतात? ही नीच वृत्ती ठेचावी लागेल. समाज, नेते आणि सर्वसामान्यांना आता आपल्यालाच सांभाळावे लागेल. आतापर्यंत आपण अजित पवार किंवा त्यांच्या पक्षावर टीका केली नाही. पण संतोष देशमुखांची हत्या करणार्‍या आरोपींची आठवण त्यांच्या पक्षाचा आमदार धन्या मुंडे काढतो? त्याच्यावर अजित पवार काहीच कारवाई करत नाही, मुख्यमंत्री त्याला पाठीशी घालत असतील तर आता आम्हाला शांत बसून चालणार नाही.


अजूनही वेह गेलेली नाही, धन्या मुंडेला संतोषभैय्याच्या हत्या प्रकरणात सहआरोपी करा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. आपण आतापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याच्या घराची पायरी चढलो नाही. पण धनंजय देशमुख म्हणत असतील तर संतोषभैय्यांना न्याय मिळावा यासाठी मी तुमच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यायला तयार आहे. एकदा त्यांना भेटून सांगूच आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावू. मी वैयक्तिक राजकारणासाठी कधी कोणाच्या दारात जाणार नाही. पण तुम्ही सांगाल तेव्हा तुमच्यासोबत येईल, असंही जरांगे पाटील म्हणाले.


धनंजय देशमुखांनी खचून जाऊ नये, ते खचले तर कुटुंब खचेल तर गाव खचेल याचा परिणाम आपल्या न्यायाच्या लढाईवर होईल. आम्ही या कुटुंबाला कधीही एकटं पडू देणार नाही, संतोषभैय्या देशमुखांचे आरोपी फाशीवर चढेपर्यंत आम्ही सोबत असू, अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी यावेळी दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आणि या प्रकरणाला गती मिळत नाही, पण संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण आम्ही दबु देणार नाही. कुणाचा बाप आला तरी आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही. सरकारची गाठ मराठ्यांसोबत आहे. असा इशराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

Comments


bottom of page