संविधान, लोकशाही, ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींचे संबोधन
- Navnath Yewale
- Aug 15
- 1 min read

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशवाशियांना संबोधित केलं. यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि भारत सरकारच्या कामांचे कौतुकही त्यांनी केलं. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य पर्व नाहिये तर प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचे प्रतिक आहे. संविधान आणि लोकशाही हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या दोन्ही गोष्टी आमच्या ताकद सुद्धा आहेत, असही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
स्वातंत्र्यानंतर देशातील प्रौढ लोकांना मताधिकार मिळाला आणि भारत लोकशाहीच मार्गावर चालू लागला. या मार्गात अनेक अव्हाने आली तरीही त्यात देशाने यश मिळवलं. राष्ट्रपती यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यातील वीरांना नमन करत त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला 78 वर्षाआधी स्वातंत्र्य मिळाल्याचं म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात ऑपरेशन सिंदूरची नोंद केली जाईल. ऑपरेशन सिंदूर हे पलगाम हल्ल्याचं चोख प्रत्यूत्तर होते. या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कर देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं.
या वर्षात आपल्याला दहशतवादाचा समाना करावा लागला. काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली हे अमानवीय होती. या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांचा समाना करण्यास तयार असल्याचं दाखवून दिलं. लष्कराने तंत्रज्ञानाच्या क्षमतेसह सीमेपार दहवाद्यांच्या स्थळांना नष्ट केलं.
भारताकडून देण्यात आलेल्या उत्तरात भारताची एकता दसून आली. जे भारताला विभाजित करण्याचा प्रयत्न करत होते त्यांना भारतीय लोकांनी एकतेतून उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर हे आत्मनिर्भर भारत माहिमेसाठी महत्वाचं ठरले. आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या माध्यमातून संरक्षणासाठी शस्त्र तयार करण्यात आली.
स्वदेशी उत्पादनात महत्वपूर्व स्तर प्राप्त केलाय आहे. संरक्षणसाठी लागणारे शस्त्र निर्माण करण्यात भारत आत्मनिर्भर झाल्याचं या ऑपरेशनमधून दिसून आलं. 15 ऑगस्ट ही तारीख देशाच्या सामूहिक स्मृतीत कोरलेली ऐतिहासिक तारीख आहे. प्रदिर्घ वसाहतवादी राजवटीत भारतीयांनी पिढ्यानपिढ्या या दिवसाचे स्वप्न पाहिले होते. त्यांचा संघर्ष आणि जिद्द, अशावादाने भरलेला होता, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.



Comments