top of page

सक्षम ताटेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी !

ree

नांदेड: शहरात घडलेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची प्रयसी आचल मामीडवार हिच्या कुटुंबीयांनी सक्षम याचा खून केला होता. या प्रकरणातील एकून आरोपींची संख्या आता आठवरती गेली आहे.


नांदेडमधील इतवारा भागातील संघसेन नगर येथील 20 वर्षीय सक्षम ताट या तरुणाचा सिद्धनाथपुरी भागातील 19 वर्षीय आच मामीडवार हिच्यासोबर प्रमसंबंध होते. मागील तीन वर्षापासून ते एकमेकांसोबत होते. या दोधांच्या प्रेम प्रकरणाला आचल्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच कारणावरून 27 नोव्हेंबर रोजी मिलिंद नगर परिसरात सक्षम ताटेची प्रेयसीच्या वडीलांनी आणि भावांनी गोळ्या घालून आणि फरशी डोक्यात मारून निर्घुन हत्या केली.


या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आचलची आई जयश्री गजानन मामीडवाड, वडील गजानन बालाजी मामीडवाड, भाऊ साहिल गजानन मामीलवाड, सोमेश सुभाष लखे, वेदांश अशोक कुंदेकर उर्फ कुलदेवकर, अमन देविदास शिरसे, आणि मुलीच्या अन्य एका अल्पवयीन भावाला यापूर्वी अटक केली आहे.


मयत सक्षम ताटे कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत व कुटुंबातील एकास सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून पीडित कुटुंबाला एकून 8 लाख 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. यापैकी 4 लाख 12 हजार 500 रुपये पहिला हप्ता पीडित कुटुंबियांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम न्यायालयात चार्ज सीट दाखल झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. आर्थिक मदती शिवाय कुटुंबियांच्या एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याता येणार आहे.

Comments


bottom of page