समता परिषदेच्या माध्यमातून आंदोलन उभारणार - भुजबळ
- Navnath Yewale
- Sep 19
- 1 min read

हैदराबाद गॅझेटिअर विरोधात हायकोर्टामध्ये पाच याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. सोमवारी कोर्टात चर्चेला आल्यानंतर कळेल. महात्माफुले समता परिषदेच्या वतिने आम्ही प्रथम मराठवाड्यात रॅल्या काढणार आहोत. नंतर मुंबईला जाणार, दिल्लीलाही जाणार आहेत, आंतरवाली सराटीमध्ये हल्ल्याच्या पूर्वी मध्यरात्री गावात मिटिंग झाली.
रात्रीच गच्चीवर दगड आणून ठेवले आणि दुसर्या दिवशी पोलिसांवर हल्ला झाल्याच्या आरोपला छगन भुजबळ यांनी आज पुन्हा दुजोरा दिला आहे.
मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर काढल्या नंतर ओबीसी नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेत्यांनी रॅल्या, मेळावे, सभांच्या माध्यमातून जरांगे पाटील, मराठा समाज आणि सरकार विराधोत तिव्र टीका केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आंरवाली सराटी येथील दोन वर्षापूर्वी घडलेल्या घटनेत थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका माजी आमदारावर आरोप केले आहेत.
घटनेपूर्वी मध्यरात्री बैठक झाली आणि दुसर्या दिवशी आंदोलनस्थळी पोलिसांवर दगफेक झाली. ज्यामध्ये 82 पोलिस कर्मचारी ज्यामध्ये महिला पोलिस कर्मचार्यांचाही समावेश होता. हा सर्व प्रकार आंतरवाली सराटी येथील बापुराव वाळेकर यांनी सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. ओबीसी हा प्रवर्ग आहे जात नाही ज्यामध्ये 374 जाती आहेत. जातिनियोजन संस्थांच्या नावे आम्ही कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ज्यामध्ये माळी महासंघ, कुणबी सेना, नाभिक सेना, सोनार सेना अशा पाच याचिका दाखल आहेत. सोमवारी हे प्रकरण कोर्टात चर्चेला येणार आहे त्यावेळेस पाहू. महात्म फुले समता परिषदेच्या वतिने मराठवाड्यात रॅली, मेळावे, सभांचे आयोजन केले आहे. त्यानंतर मुंबईला जाणार, दिल्लीलाही जाणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.



Comments