top of page

सरकारची राज्यभरात‘ सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिम; तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या धडक्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सपोर्ट’

मुंबई : राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदेशीर गुटखा विक्रीविरोधात कठोर पावले उचलणारे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका सध्या गैरप्रकार करणार्‍यांनी घेतला आहे. दूध भेसळ, सनासुदीच्या काळात मिळाईतील गैरप्रकार आणि गुटखा विक्रीवरप छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त केल्यानंतर राज्यभर त्यांचे कौतुक होत आहे. मात्र तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासन विभागात रुजू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सुूचना दिल्या होत्या यावर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.


महाराष्ट्रात सुरू असलेल्या संपूर्ण कारवाईबाबात बोलताना तुकाराम मुुंढे म्हणाले की, नवीन चॅनेल किंवा विभागात पोस्टिंग झाल्यानंतर जनरली अशा प्रकारची चर्चा होत असतेश. राज्य सरकारचा भर हा ‘ सेफ फूड, सेफ ड्रग्ज आणि सेफ महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आहे. मुख्यमंत्र्यांनी या सेक्टरमध्ये राज्याला अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या. कारण या क्षेत्रातील कामाचा थेट परिणाम हा महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे या कारवाईत आणि कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.


राज्याला सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे पुरवून ‘ सेफ महाराष्ट्र’हे धेय्य साध्य करायचे आहे. यासाठी प्रशासनाकडून आवश्यक असणारा सर्व पाठिंबा (सपोर्ट) आणि कारवाईबाबतच्या सर्व स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस अयांनी दिल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले येत्या काळात अन्न व औषध प्रशासनासह संबंधित क्षेत्रात नियमभंग करणार्‍यांवर कडक कारवाईचा बडगा उचलला जाणार असून, सरकारकडून त्यांना पाठबळ देण्यात आले आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना : महाराष्ट्रामध्ये आपल्याला या सेक्टरमध्ये अत्यंत चांगलं काम करायचं आहे. त्याचा परिणाम शेतकर्‍यांवर होतो, सर्व सामान्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे कोणताही कॉम्प्रमाईज न करता जे आपल्याला सेफ फूड, सेफ ड्रग्ज, सेफ महाराष्ट्र जो अचिव्ह करायचा आहे. आवश्यक असलेल्या पूर्ण सपोर्ट आणि त्यासाठी असलेल्या सर्व सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयएएस तुकाराम मुंढे यांना दिल्या आहेत.


तीन दिवसांत 31 धाडी, 2 कोटीचा साठा जप्त : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) 4 ते 6 ऑगस्ट या तीन दिवसांत राज्यभर विशेष धडक मोहिम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गुटखा, पान मसाला तसेच इतर अन्न पदार्थावर छापेमारी करत एकून 31 धाडी टाकल्या आहेत. या कारवाईत 2 कोटी 82 लाख 99 हजार 772 किमतीचा साठा जप्त केला आहे. यामध्ये 22 जणांना अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याविरोधातील कारवईत 19 एफआयआर दाखल करण्यात आले असून 20.29 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. तर दूध , दूग्धजन्य पदार्थ, बेकरी, मसाले, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांवरील कारवईत 2.62 कोटींचा साठा जप्त करण्यात आला. याच मोहिमेत राज्यीरातील 63 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली.


त्यापैकी 38 अस्थापनांना सुधारणा नोटीस, तर 7 अस्थापनांचे एफएसएसएआय परवाने निलुंबित करण्यात आले आहेत. बृहन्मुंबईत दादर, अंधेरी, सांताक्रूझ आणि कुर्ला येथील चार खाद्य अस्थापनांचे परवाने स्वच्छतेच्या गंभीर त्रुटींमुळे निलंबित करण्यात आले. आयआयटी बॉम्बेच्या काही हॉस्टेल मेसनाही आवश्यक परवाना नसल्याने बंद करण्योच आदेश देण्यात आले. एफडीएने स्पष्ट केले आहे की, ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या अस्थापनांच्या विरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.

bottom of page