top of page

सरकारने जरांगे पाटलांची डेडलाइन पाळली; मराठवाडामुक्ति संग्रामदिनी कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

मराठवाड्यातील जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमात्र


ree

मुंबईत आंदोलन करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद लागू करत कुणबी प्रमाणपत्र वाटपाची मागणी केली होती.जरांगे पाटील यांच्या मागणीवर महायुती सरकारने यासंदर्भात अध्यादेश काढला.

जरांगे पाटील यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार बीड जिल्हा दौर्‍यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. योवळी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे देखील उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनात यशस्वी झाल्यानंतर, मराठा समाजातील लोकांना हैदराबाद गॅझेटिअर लागू करताना, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील भाजप महायुती सरकारने जरांगे पाटील यांची अपेक्षापूर्ती केली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील काही मराठा समाज लोकांना आज कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. ज्या मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं, त्यांनी जरांगे पाटील यांचे आभार मानले. तसंच याचे सर्व श्रेय जरांगे पाटील यांना जात, अशी प्रतिक्रिया दिली. आता आमचा अनेक वर्षाचा संघर्ष संपला असून आमच्या स्वप्न पूर्ण झालं, अशी प्रतिक्रिया देखील कुणबी प्रमाणपत्र ज्यांना मिळेल त्यांनी दिली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं असतानाच, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते हिंगोली इथं कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आले. परंतु मंत्री झिरवळ यांनी हैदराबाद गॅझेटिअर न्यायालयात कितपत टिकेल, यावर विधान केल्याने खळबळ उडाली आहे. कुणबी जातीचे प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार की नाही, याबद्दल मंत्री झिरवळ यांनी साशंकता व्यक्त केली.


तसंच जरांगे पाटील यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिला आहे, यावर बोलताना मंत्री झिरवळ म्हणाले, “ बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचे किंवा नाही हे कायदा ठरवेल. कारण संविधानात हैदराबा गॅझेटिअरमध्ये काय आहे हे तपासावे लागेल,.


तसंच जरांगे पाटील यांनी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण ेदण्यासाठी पाठिंबा दिला आहे, यावर बोलताना मंत्री झिरवळ म्हणाले, “ बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्यायचे किंवा नाही हे कायदा ठरवेल. कारण संविधानात आणि हैदराबाद गॅझेटिअरमध्ये काय आहे हे तपासावे लागेल. आदिवासी समाजाला देखील संविधानाचे संरक्षण आहे. प्रत्येक समाजाने शांततेने आंदेालन करायला पाहिजेत.” लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते नोंदी मिळालेल्या मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले.


अजित दादांचा ताफा युवकांनी आडवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौर्‍यात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी पोलिस मैदानाकडे जात असताना, दोन युवकांनी त्यांच्या ताफ्याच्या समोर यंत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने खभबळ उडाली. केज तालुक्यातील कुंभेफळ इथले हे युवक आहेत. कुंभेफळ ग्रामसभेची चौकशी करून कारवाईची प्रमुख मागणी आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या दोघा युवकांना ताब्यात घेतले.


गळ्यात बाजीरीचे कणीस, कांद्याची माळ घालून आंदोलन

26 लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचा विश्वास देऊन मतं मिळवली. सत्तेचा मलिदा खाल्ल्यावर या लाडक्या बहिणी अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला, असा घणाघात करत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अ‍ॅड. हेमा पिंपळे यांनी गळ्यात बाजरी ओंबीच्या माळ घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍यावेळी आंदोलन केले. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असताना, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी या आंदोलनातून केली. जनसुरक्षा कायदा लादून लोकशाही दडपून टाकण्याचा प्रयत्न सरकार आणि प्रशासन करत असल्याचा निषेधही करण्यात आला. सरकारने लोकांचा विश्वासघात केला असून, शेतकर्‍यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अ‍ॅड. हेमा पिंपळे केला.

Comments


bottom of page