सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 10 नक्षलवादी ठार
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

छत्तीगडमधील गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये 10 नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. रायपूर रेंज आयजी अमरेश मिश्रा म्हणाले की, गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे आणि अधूनमधून गोळीबार होत आहे. काही नक्षलवादी ठार होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये संघटनेचा एक मोठा चेहरा मानला जाणारा सीसी सदस्य मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण यांचाही समावेश होता. सुरक्षा दलांची ही कारवाई नक्षलविरोधी कारवाईतील एक मोठी कामगिरी मानली जात आहे. रायपूर रेंज आयजी अमरेश मिश्रा यांनीही माहिती दिली. की गुरुवार (दि.11) सकाळपासून गरियाबंदमध्ये नक्षविरोधी ऑपरेशन सुरू आहे. सकाळपासून ही चकमक सुरू आहे.
रायपूरचे पोलिस महानिरिक्षकांनी चकमकीची पुष्टी केली आहे.
त्याच वेळी, छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात 16 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसमोर आत्मसमर्पण केले. नारायणपूरचे पोलिस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी सांगितले की, सर्व16 नक्षलवादी हे निन्म दर्जाचे कार्यकर्ते होते आणि जे जनता सरकार, चेतना नाट्य मंडळ आणि माओवाद्यांच्या पंचायत मिलिशियाच्या सदस्यांसह विविध युनिट्सशी संबंधित होते.
याशिवाय छत्तीगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात गुरुवारी (11 सप्टेंबर) नक्षलवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात सीआपीएफचे दोन जवान जखमी झाले. अधिकार्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 10:30 वाजता इंद्रावती नदीवरील सतधार पुलाजवळ घडली, जेव्हा सीआपीएफच्या 195 व्या बटालियनचे एक पथक मालेवाही पालिस स्टेशन परिसरातील त्यांच्या छावणीतून क्षेत्र वर्चस्व मोहिमेवर निघाले होते.



Comments