सोलापूरात भरदिवसा तरुणाची कोयता, दगडाने ठेचून हत्या आरोपींचा पूर्वनियोजीत कट; पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अवघ्या दोन तासात ठोकल्या बेड्या
- Navnath Yewale
- 17 hours ago
- 2 min read

अलिकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीने पुरोगामी महाराष्ट्रात पुरते थैमान घातले आहे. महिला अत्याच्यार, अल्पवयीन मुलीं वासणेच्या शिकार होवून त्यांच्या क्रूर हत्या त्याचबरोबर हत्याकांड, गुंडाचा हैदोस अशा महाराष्ट्राला हादरवणार्या विविध गुन्हेगारी घटनांचा वाढता आलेख संताप आणि भीतीदायक ठरत आहे.
नसरापूर घटनेसह बीडच्या घटनामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली असतानाच सोलापूरातील संपत्तीच्या वादातून भावजय, पुतन्या- पुतनीच्या क्रूर हत्याकांडानंतर पुन्हा सोलापूरातून महाराष्ट्राला हदरवणारं हत्याकांड समोर आलं आहे. सोलापुरात एका तरुणाची सिनेस्टाईल निर्घुण हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी आरोपींनी सोशल मीडियावर स्टेटस् ठेवला होता. यानंतर भर रस्त्यात हत्या करण्यात आली. मृत तरुणाला 3 पत्नी आणि 8 मुलं आहेत. कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापुरातील 70 फूट रोड परिसरात ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रविवारी सकाळी 9:30 च्या सुमारास एका तरुणाची सहा जणांनी मिळून कोयता, काठी, तलवार आणि दगडाच्या सहाय्याने निर्घुण हत्या केली. सुरेश कृष्णा श्रीराम (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे.
दरम्यान आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखून हत्या केली आहे. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर “ रक्तचरित्र” या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नही, एक एक करके मारेंगे अशा पद्धतीचा व्हिडिओ हा इंस्टाग्राम वर स्टेटस् म्हणून ठेवल्याने आरोपींनी पेालिसांना देखील आव्हान दिले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या हत्या प्रकरणात आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णारेड्डी, करण श्रीराम, समित श्रीराम, राहुल अण्णारेड्डी या आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला तीन पत्नी असून त्यांची आठ लेकरं आता अनाथझाली आहेत. मृत सुरेश कृष्णा श्रीराम हा याचा वडिलोपार्जीत वराह पालनाचा व्यवसाय आहे. काही वर्षापूर्वी सुरेश श्रीराम याने 15-20 वराह मारुन टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता. अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे सहा जणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काठा काढण्याचा प्लॅन आखला. यातूनच त्याची क्रूर हत्या केली.
जून्या वादाचा कडेलोट झाला आणि अगदी सकाळच्या सत्रातच लाठी- काठी कोयता, आणि दगडाने सुरेश श्रीराम याचा ठेचून काटा काढण्यात आला. मयत सुरेश श्रीराम याच्या आजोबांपासून संशित आरोपी आण्णारेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचे वाद सुरू आहेत. सोलापुरात भर दिवसा हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही, या घटनेचा जाहीर निषेध अशा भावना जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी व्यक्त केल्या आहेत. मयत सुरेश श्रीराम याला तीन भाऊ असून एक दिव्याग आहे. त्याच्या इतर दोन्ही भावांचाही पूर्वी अशाच वादातून खून झाल्याची शासकीय रुग्णालयात सुरू होती. मयत सुरेशला तीन पत्नी, सहा मुली, दोन मुले आहेत. मात्र घटनेतील मयत व्यक्तीसह आरोपींवर यापूर्वीचे देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.



Comments