top of page

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घुमशान; उमेदवारांना करावी लागणार कसरत


गेल्या चार वर्षापासून प्रशासकराज अनुभवणार्‍या नागरी जनतेला हक्काचा लोकप्रतिनिधी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. राज्य निवडणुक आयेागाने मंगळवारी (दि.4 नोव्हेंबर) निवडणुक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, उमेदवारांना प्रचारासाठी अवघे पाच दिवस मिळणार असल्याने मतदारांपर्यत पोहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.


निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात 10 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबरपर्यंत,तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. नामनिर्देशन मागे घेतल्यानंतर उमेदवारांना निवडणुक चिन्ह मिळणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रचार साहित्याद्वारे उमेदवारांना प्रचार सुरू करता येईल.


चार वर्षानंतर निवडणुक होत असताना निवडणुक प्रचारासाठी अवघे पाच ते नऊ दिवस मिळणार असल्याने उमेदवारांना धडकी भरली आहे. शहरातील प्रभाग मोठे असल्यानेसर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 2 डिसेंबरला मतदान असल्याने 30 नोव्हेंबर रोजी 5 वाजता जाहिर प्रचार बंद होईल. जे उमेदवार गेल्या पाच वर्षापासून प्रभाग सक्रिय आहेत. ज्यांना नागरिक ओळखतात अशाच उमेदवारांना निवडणुक प्रचार जरा सोईचा असणार आहे. मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून जे नवखे उमेदवार रिंगणात उतरणार आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Comments


bottom of page