दिल्लीत भाजपच्या गोटात हालाचालींना वेग: प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही तातडीने दिल्लीत दाखल

नवी दिल्ली / मुंबई: दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टी च्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीत विद्यार्थ्यांचं आदोलन सुरू होतं. सोमवारी (दि.20 जुलै) विद्यार्थ्यांनी ‘चलो संसद’ चा नारा देत संसद भवनावर मोर्चा काढला. मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद वाढला. आंदोलनाचा रेटा आणि त्याला मिळत असलेला पाठिंबा पाहता अखेर आज शनिवारी (दि.25) प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. यानंतर भाजपच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.
शिक्षणमंत्री म्हणून अभ्यासक्रमात बदल करण्यात प्रधान यांनी पार पाडलेली कामगिरी, त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असलेला पाठिंबा पाहता राजीनाम्याची मागणी पूर्ण होईल यांची शक्यता धूसर वाटत होती. पण सीजेपीच्या प्रतिनिधींनी राजीनाम्याच्या मागणीवर तडजोड करणार नसल्याची भूमिका केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ठामपणे घेतली. त्यामुळे सरकारनं माघार घेतली. गेल्या 12 वर्षापासून मंत्री असलेले प्रधान अखेर पायउतार झाले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज पहाटे पंढरपूर येथे विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी धडकताच भाजपच्या केंद्रीय गोटात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतील अशी माहिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला निघाले आहे. महाराष्ट्रातील दोन्ही नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत त्यांच्या या भेटीकडे केंद्रीय मंत्रिमंडळातील सभाव्य फेरबदलाच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. मोदी सरकारमध्ये लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात शिवसेनेचे खासदार अणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते.
प्राप्त माहितीनुसार, फडणवीस आणि शहांच्या बैठकीत मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलावर चर्चा होऊ शकते. श्रीकांत शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सरकारडून याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार गळाला लावून शिंदे यचांनी ऑपरेशन टायगर यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांचा आकडा आता 13 वर पोहोचला. यामुळे एनडीए सरकार आणखी भक्कम झालं. शिंदेसेनेच्या खासदारांचा आकडा वाढल्यानं त्यांच्या पक्षाला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांचं नाव आघडीवर आहे.



Comments