top of page

स्व. विलास घुले हत्या प्रकरण: बीडमध्ये विराट मोर्चा !पुरावणी जलबाबातील आरोपीला अटक करून सर्व आरोपींवर मकोका लावण्याची मागणी

बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील स्व. विलास घुले यांच्या खुन प्रकरातील आरोपींना मकोका लावण्यात यावा पुरवणी जबाब मधील आरोपींना तात्काळ अटक करावी. घुले कुटुंबियांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून स्व. घुले यांच्या मारेकर्‍यांविरुद्धचा संताप प्रामुख्याने दिसून आला.

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण येथून सुरू झालेला हा विराट मोर्चा सुभाष रोड- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक- बसस्थानक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतिर्थ) परिसर-नगर रोड मार्गे जिल्हाकिधारीकार्यालयावर धडकला. न्याय द्या, न्याय द्या अशी मागणी करत मोर्चेकर्‍यांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेतले होते. या मोर्चामध्ये घुले कुटुंबीयांसह बाळासाहेब सानप, वकील मंगेश ससाणे, गुणरत्न सदावर्ते, बटुळे बाब यांच्यासह हजारो बहूजन बांधव सहभागी झाले होते.


गेल्या 17 दिवसांपासून स्व. विलास घुले यांचे कुटुंबिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपाषणाल बसले आहेत. मात्र प्रशासनाने अद्यापही त्यांची दखल घेतलेली नाही असा आरोप करण्यात आला. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांचा एकेरी ‘मन्या’ असा उल्लेख करत शिवराळ भाषेत टिकेची झोड उठवली.

Comments


bottom of page