top of page

सीजेपी प्रवक्ता अशुतोष रांका यांच्यावर राजस्थानच्या जयपूरमध्ये हल्ला

शाळा पाहाणीसाठी गेलेल्या सीजेपी टीमला स्थानिकांकडून मारहाण, गाड्याच्या काचा फोडल्या; सीजेपीचा भाजपवर गंभीर आरोप, अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

जयपूर/ छत्रपती संभाजीनगर : जंतर- मंतरवरील आंदोलनाच्या मोठ्या यशानंतर कॉकरोच जनता पार्टीने देशाचे भविष्य घडवणार्‍या सरकारी शाळा सुधारण्यासाठी ‘ स्कूल ठिक करो’ मोहिम सुरू केली आहे. सीजेपीची टीम राज्यभरातील सरकारी शाळांना भेट देवून स्थानिक व्यवस्थेचे शाळांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधत आहे. शुक्रवारी (दि.21) सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास सीजेपी प्रवक्ता अशुतोष रांका व त्यांची टीम जयपूरमधील बागरू येथील रामपुरा कंवरपुरा येथील शासकीय प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचले. याठिकाणी काही नागरिकांनी त्यांना मारहाण करून हाकलून लावले. त्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.


या हल्ल्याप्रकरणी आशुतोष रांका यांनी भाजप कार्यकर्त्याऐवर हल्ल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले “ हल्ल्यात वाहनांच्या काचा आणि मोबईल फोडण्यात आले. एका महिला सहकार्‍यालादेखील मारहाण करण्यात आली आणि तिचा शर्ट फाडण्यात आला. आमच्यवा टीममधील एका सदस्याचा हात फ्रॅक्चर झाला.” असा आरोप रांका यांनी केला.


रांका म्हणाले “ आज संपूर्ण देशाने भाजपची गुंडगिरी प्रत्यक्ष पाहिली. पोलिसांना याठिकाणी हा प्रकार होणार असल्याची माहिती आधीपासूनच होती. जयपूरचे हे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरून घडले. आम्ही 48 तासांचा अल्टिमेटम देत आहोत हल्लेखोरांना अटक झाली पाहिजे आणि शाळा तपासणी थांबवण्याचा आदेश मागे घेतला पाहिजे. असे न झाल्यास, आम्ही संपूर्ण राजस्थानमध्ये आंदोलन करू आणि दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणी करू” असा इशारा अशुतोष रांका यांनी दिला.


तत्पूर्वी सकाळी 8:00 वाजता, काही सीजेपी कार्यकर्त्यांना याच गावातील गुंडांनी धक्काबुक्की केली. गुंडांनी त्यांना गावातून हाकलून दिले. सीजेपी विरोधात घोषणाबाजी करत या टोळक्याने शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली लावून गावातील मुख्य रस्ता अडवला आणि येणार्‍या -जाणार्‍या वाहनांची तपासणी सुरू केल्याचीही माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अशुतोष यांच्यासह 10 ते 15 सीजेपी कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारसाठी एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीजेपीने वाटिका रोडवरील भट्टावाला सरकारी शाळेची पाहणी करण्यवाची योजना आखली होती. पण या प्रकारामुळे ही पाहणी तुर्तास रद्द करण्यात आली आहे.


दरम्यान, या सगळ्या प्रकारावर अशुतोष रांका यांनी ट्टिट करत राजस्थान भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “ कंवपुरा येथील रामपुरामधील सरकारी शाळा गेल्या अनेक वर्षांपासून म्हशींच्या गोठ्यात चालवली जात आहे. मी नुकताच तिथे पोहोचलो. पण तिथे पोहोचलेल्या आमच्या टीममधील काही सदस्यांवर भाजपच्या गुंडांनी पुन्ह हल्ला केला.


येथील विद्यार्थी म्हशींच्या गोठ्यात शिकत आहेत. हे भाजपला मान्य आहे. पण आम्ही या शाळा सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत, हे त्यांना मान्य नाही. यापेळा अधिक लाजिरवाणे काय असू शकते? असा असा संतापजनक सवालही रांका यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर सीजेपीच्या टिमला मारहाण करणारे हे गावकरी नसून भाजपने भाड्याने आणलेले गुंड आहेत. त्यांचे नेते, कमल प्रधान, तिथल्या गरीब लोकांची जमीन बळकावण्याचे काम करत आहे. मुलांना म्हशींच्या गोठ्यात शिकवले जात आहे. आणि जेव्हा आम्ही हे थांबवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भाजप आपले गुंड पाठवत आहे. किली लाजिरवाणी परिस्थिती आहे. असा संतापही रांका यांनी व्यक्त केला आहे.


अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा : जयपूरमध्ये आमची टीम शाळा पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना होती. एवढं असून सुद्धा आमच्या अशुतोष रांका यांच्या टीमवर आपण तो व्हिडिओ पाहिला असेल कसा आमच्या टीमवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यांना मारहाण करण्यात आली. महिला सहाकर्‍यांनाही मारहाण करण्यात आली. दारू पिऊन आलेल्या गुंडांनी त्यांना मारहाण केली आहे. आमची भूमिका आहे की, यांनी कितीही हल्ले करूद्या आम्ही काही चुकीचे काम करायला चाललो होता का?, म्हशीच्या गोठ्यात शाळा कशी चालू शकते, तिथ लहान लेकरं कसे शिकू शकतात. आम्ही ते उघड करायला गेलो होतो. आणि यांना जर का वाटत असेल की असे हल्ले करून हे आम्हाला शांत बसवतील किंवा आम्ही आमची मोहिम मागे घेवू असं काही होणार नाही.


यांनी कितीही हल्ले करू द्या आमचं जे ‘ स्कूल ठिक करो कॅम्पेन’ चालू राहील आम्ही मागे सरकणार नाही. जे लोकं हल्ला करतायत त्यांच्याकडून सुरक्षा घ्यायची? राजस्थानमध्ये कोणाची सरकार भाजपचीच हल्हा कोणी केला त्यांच्याच गुंडांनी केलाय आणि त्यांनाच निवेदन देऊन सेक्यूरिटी मागवायची का?. आम्हाला काही सेक्यूरिटीची गरज नाही लोकं आमच्या सोबत आहेत.


गुंडांनी, भाजपने किती त्रास दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आता ÷उद्या ईडी लावतील सीबीआय लावतील काय कराचं ते करू द्या. मी जयपुरला नक्की जाणार आहे. मी अशुतोषला बोललो की तुम्ही काय ती टीमची आधी काळजी घ्या आच्या सहकार्‍यांची डोकी फुटली आहेत, एकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे अगोदर त्यांना उपचाराची गरज आहे.त्यासाठी त्यांना अगोदर दवाखान्यात दाखल करणं गरजेचं आहे त्यानंतर मी नक्कीच जयपूरला जाणार आहे.


मी महाराष्ट्रातील शाळांची अवस्था बिकट आहे. लातूरमध्ये एक शिक्षकी शाळा पहिले ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक टिचर शिकवते. बर्‍यासच्या शाळेत आसन व्यवस्था नाही, बाथरूम नाहीत, पाणी नाही, लाईट नाही इमारतींच्या अवस्था बकाल आहे. जनावरांच्या गोठ्या प्रमाणे काही शाळांची अवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्वत:ची फिलेवर लपवण्यासाठी हे लोकं काय करतायत की बाहेरून लहान मुलांना शाळेत आणून बसवताय आणि त्यांना सांगतायत की चांगलं बोलायला लावतात शाळेबद्दल. मी मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ही शाळा आमची नाही आम्हाला आज बोलावलंय इथे. स्वत:च्या चुका लपवण्यासाठी लहान मुलांचा उपयोग करू नये.


एवढा फ्रॉड कराण्यापेक्षा तुम्ही शाळा चांगल्या करा हे सगळं करायची गरज नाही पडणार. बीडमध्ये शिक्षण विभागाने आदेश दिले की, कोणालाही शाळेची पाहणी करायची असेल तर आधी परवानगी घ्यावी लागेल. ज्या शाळेत मुलांचे आई- वडिल जाऊ शकतात आम्ही ही त्यांच्या आई-वडिलांसोबत चाललोय तुम्हाला भिती कशाची आहे एवढी. शाळाच बघायला चाललोय ना, ज्या शाळेत गांजा फूकला जातोय, दारू पिली जातेय ते तुम्हाला चालतं. आणि आम्ही शाळा बघायला चाललो की तुम्हाला त्रास होतो. शाळात विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आम्ही शिक्षणाधिकार्‍यांना पंधरा दिवसाचा वेळ दिला आहे. त्यानंतर आम्ही गाववाल्यांसोबत मोठं आंदोलन उभारणार आहोत.


हिंगोलीच्याच नाही तर लातूर जिल्ह्यातील ग्रामस्थही आंदोलनासाठी आग्रही आहेत. सरकारला एकच आवाहन आहे की तुच्याकडे सगळे गुंडेच भरलेले आहेत तुमचे मंत्रीही सगळे गुंडे आहेत. असे हल्ले करून शाळा ठिक होणार आहेत का? तुम्हाला गुंडगिरीसाठी निवडून दिले आहे का? त्यापेक्षा शाळा ठिक करा, चांगले कामं करा काही तरी असंही दिपके माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

Comments


bottom of page