top of page

स्वत:ला मंत्रिपद अन् अशोख खरातला आमदार करण्याची शिफारस ..? तृप्ती देसाई

भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. कित्येक महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली सध्या तो पोसिलांच्या ताब्यात आहे. त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातच्या विरोधात एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोर्‍हे यांनी मंत्रिपद मिळावं यासाठी भविष्या पाहण्यासाठी खरातची भेट घेतली होती, असा अरोप भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केला आहे. नीलम गोर्‍हे यांनी मात्र पत्रकार परिषद घेऊन हा दावा फेटाळला आहे. आता निलम गोर्‍हे यांच्या पत्रकार परिषदेनंतर तृप्ती देसाई यांनी गोन्हे यांच्यावर जोदार हल्लाबोल केला आहे. नीलम गोर्‍हे खोटं बोलत आहेत असा घणाघातही त्यांनी केला.


नीलम गोर्‍हे यां खोटं बोलत आहेत. नीलम गोर्‍हे यांनी अशोक खरात याला हात दाखवला होता. गोर्‍हे यांनी आपलं भविष्य पाहिलं होतं. मात्र मी अशोक खरात यांना भेटलेच नाही असं त्या खोटं बोलत आहेत, असा थेट दावा देसाई यांनी केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोर्‍हे चक्क वाचून दाखवत आहेत. एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो का नाही हे सांगताना वाचून बोलण्याची काय गरज? असा रोखठोक सवालही त्यांनी केला आहे.


एवढ्या अभ्यासू असलेल्या नीलमताई एवढं खोटं बोलत असतील असं वाटलं नव्हतं, अशी खंतही देसाई यांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीनूे नीलम गोर्‍हे या खोटे बोलत आहेत यावरून वाटतंय की गोर्‍हे या स्वत:ला मंत्रिपद मिळवण्यासाठी आणि अशोक खरातला आमदार करण्यासाची शिफारस पक्षप्रमुखाकडे केली असेल, असा दावाही त्यांनी केला.

Comments


bottom of page