top of page

एलपीजी गॅस सिलिंडर बाबत सरकारचा मोठा निर्णय; उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या सबसीडी कोट्यात कपात, आता केवळ चार सिलिंडरवर मिळणार सबसिडीचा लाभ

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज व्यापारी जलहाजांच्या वाहतुकीसाठभ बंद आहे. यामुळे मध्य पूर्वेतून होणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा सध्या जवळपास ठप्प आहे. त्यामुळे काही प्रमाणात एलपीजी गॅसची टंचाई जाणवत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सरकारने गॅस सिलिंडरच्या एका नियमात बदल केला होता. तो म्हणजे ज्याच्याकडे पीएनजी गॅसचं कनेक्शन आहे. त्याला आता एलपीजी गॅसचं कनेक्शन मिळणार नाही. तसेच ज्याच्याकडे एलपीजीचं कनेक्शन आहे, त्यांना पीएनजीचं कनेक्शन मिळणार नाही. म्हणजेच एका व्यक्तीच्या नावावर आता दोन कनेक्शन घेता येणार नाहीत, दरम्यान या नियमात बदल केल्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने एलपीजी एलपीजी सिलिंडर संदर्भात पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वसमान्यांना याचा मोठा झटका बसणार आहे.


सरकारच्या निर्णयानुसार आता उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला केवळ चारच सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. पूर्वी या योजनेतील ग्राहकांना वर्षाला 9 गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळायची, मात्र आता सरकारने सबसिडीवाल्या सिलिंडरच्या संख्येमध्ये कपात केली असून आता केवळ चारच गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. सन 2016 मध्ये उज्वला गॅस योजना सुरू झाली होती. त्यावेळी सर्वसामान्य लोकांना उज्वला योजनेंतर्गत 12 गॅस सिलिंडरवर सबसिडीचा लाभ मिळत होता. त्यानंतर गेल्या वर्षी सबसिडीवाल्या सिलिंडरच्या कोट्यामध्ये तीन सिलिंडरची कपात करण्यात आली होती. 12 ऐवजी 9 सिलिंडरवरच सबसिडी मिळत होती. आता हा कोटा आणखी कमी करण्यात आला आहे, त्यामध्ये तब्बल 5 गॅस सिलिंडरची कपात करण्यात आली आहे. आता या योजनेतील लाभार्थ्यांना वर्षातून केवळ 4 सिलिंडरवरच सबसिडी मिळणार आहे.


सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. खिशावरही आर्थिक ताण वाढणार आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडे गॅस सिलिंडरची दरवाढ आणि दुसरीकडे सबसिडीकोट्यात कपात सर्वसमान्यांवर असा दुहेरी फटका बसणार आहे.

Comments


bottom of page