खासदाराचे राजकीय महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; आयोगाने पाठवली नोटीस, कारवाईची टांगती तलवार , खासदारकीही धोक्यात
- Navnath Yewale
- 4 days ago
- 2 min read

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्यावर कारवाईची टांकती तलवार आहे. अलीकडचे पप्पू यादव यांनीराजकारणात काम करणार्या महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांनी,90 टक्के महिलां नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत,असे म्हटले होते, आत या वक्तव्यावरुन खळबळ उडाली असून बिहार राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. आयोगाने पप्पू यादव यांना याबाबत मंगळवार दि.21 एप्रिल 2026 रोजी नोटीस बजावली असून उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पप्पू यादव यांनी, 20 एप्रिल रोजी महिला आरक्षणावर वादग्रस्त विधान केले होते. यावेळी पप्पू यादव म्हणाले होते की, महिलांच्या सुरक्षेवर लक्ष दिले जात नाही. देशात लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये नेत्यांची मोठी भूमिका आहे आणि अनेक खासदारांवर गंभीर आरोप आहेत. 90 टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत, त्यांच्या राजकीय करिअर नेत्यांच्या बेडवरुन सुरू होते.
या वक्तव्यावरून आता एकच खळबळ उडाली असून याची दखल स्वत:हून बिहार राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा यांनी पप्पू यादव यांना नोटीस पाठवली आहे. ज्यात त्यांनी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये आपण राजकीय क्षेत्रात काम करणार्या महिलांबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य केलं आहे.
राजकारणात काम करणार्या महिला कोणत्या ना कोणत्या राजकारण्यासोबत ‘ बेड शेअर’ करुनच पुढे येतात. 90 टक्के महिला नेत्यांच्या खोलीत गेल्याशिवाय राजकारण करू शकत नाहीत. दररोज सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल होत असतात. शाळा असो किंवा कार्यालय, प्रत्येक ठिकाणी महिलांचे शोषण होते. असे त्यांनी म्हटलं आहे. तुमचे हे विधानमहिलांचा आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेला ठेस पोहचवणारे आहे.
यामुळे आता असे घृणास्पद वक्तव्य आपण का केले? याचे उत्तर आयोग मागत आहे. तर तुमचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे शिफारस का केली जाऊ नये? याचे स्पष्टीकरण पत्र मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत सादर करावे, असे आयोगाने पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसवरुन आता पप्पू यादव यांची खासदारकी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. पप्पू यादव आपल्या स्पष्टीकरणातून काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठारणार आहे



Comments