top of page

छाप्यासाठी आलेल्या ईडी अधिकार्‍यांची गाडी फोडली, केरळममध्ये राडा

May 27
1 min read

मुख्यमंत्रीपद जाताच यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ईडीच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधकिर्‍यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली. मात्र, कारवाईसाठी आलेल्या ईडी अधिकार्‍यांची गाडी कार्यकर्त्यांनी दगड, विटांनी फोडली. जमावापुढे तपास यंत्रणेच्या अधिकार्‍यांना शेकडो पोलिसांनी अक्षरश: सुरक्षा कडे तयार करून मार्गस्थ केले.

केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनाराई विजय यांच्या घरावर ईडीनं आज पहाटेच नाट्यमयरित्या धाड टाकली. मुख्यमंत्रीपद जाताच विजयन यांच्या अडचीणत वाढ झाली आहे. ईडीच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंतणेच्या अधिकार्‍यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई केली आहे. ईडीने केवळ माजी मुूख्यमंत्र्याच्या तिरुवनंतपुरम येथील घरावरच नाही, तर संपूर्ण केरळमध्ये एकाच वेळी तब्बल 12 ठिकाणांवर जोरदार छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये विजय यांच्या रेंटवर असलेल्या घराचाही समावेश आहे.


सत्ता हातातून जाताच विरोधकांवर केंद्रीय यंतणांचा फास कसा आवळला जातो अशा राजकीय वर्तुळात चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान ईडीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण छापेमारी कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या प्रकरणाशी जोडलेल्याचं सांगितलं जात आहे. या कंपनीकडून बनावट किंवा खोट्या खर्चाच्या नावाखाली वेगवेगळ्या बड्या व्यक्तींना कोट्यवधी रुपयांचा फंड ट्रान्सफर करण्यात आल्याचा अरोप आहे.


या आर्थिक गैरव्यवहराच्या लाभार्थ्यांना माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन हिचेही नाव असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ईडीने आपला मोर्चा वीणा विजयन यांच्याशी संबधीत कंपन्या आणि कार्यालयांकडे वळवला. तिरुवनंतपुरम, कोच्ची, कन्नूर या तीन शहरांमध्ये 12 ठिकाणी घर, कार्यालयावर छापेमारी सुरू आहे. या कारवाईसाठी आलेल्या ईडीच्या अधिकार्‍यांच्या गाडीवर कार्यकर्त्यांच्या जमावाने दगडफेक केली. जमावाने दगड, विटांनी गाडीच्या काचा फोडल्या. जमावापुढे सुरक्षा जवानांनी अधिकार्‍यांच्या गाडीला सुरक्षा कडे करून जमावाच्या बाहेर काढले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

Comments


bottom of page