तामिळनाडूत ऐतिहासिक मतदान, सर्व रेकॉर्ड ब्रेक! 82.24 टक्के मतदानाची नोंद; मतदारांच्या हायव्होल्टेज करंटने दिग्गजांची झोप उडाली, निकालाची धाकधूक वाढली
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

चेन्नई: तामिळनाडूच्या 74 वर्षाच्या लोकशाही प्रवासात आज एक नवा मैलाचा दगड गाठला गेला. गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दुपारी 5 वाजेपर्यंत तब्बल 82.24 टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे. 3.6 लाख निवडणुक कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षा दलांच्या देखरेखीखाली राज्यात मतदारसंघांत हे मतदान पार पडले.
राज्यातील 5.73 कोटी मतदरांपैकी बहुतेकांनी आज मतदानासाठी उत्साह दाखवला. तामिळनाडूच्या निवडणुक इतिहासात 2011 मधील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 78.01 टक्के मतदनाची नोंद झाली होती. त्यानंतर 2016 (74.81%) आणि 2021 (73.63%) मध्ये मतदनाचा टक्का घसरला होता. मात्र आज झालेल्या 82 टक्के हून अधिक मतदानाने 2011 चा सुवर्ण मापदंड मागे टाकल्याचे स्पष्ट होत आहे.
महिला मतदारांचे वर्चस्व कायम: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, तामिळनाडूमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. एकूण 5.73 कोटी मतदरांपैकी 2.93 कोटी महिला मतदार आहेत, तर पुरुषांची संख्या 2.83 कोटी आहे. 2016 पासून ही पंरपरा सुरू असून यंदाही फोर्ट सेंंट जॉर्जची सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांना केंद्रस्थानी ठेवले होते.
यंदाच्या निवडणुकीत 7,728 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. जी मागील निवडणुकीच्या तुलनेत अधिक आहे. तसेच सुमारे 14.6 लाख नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदनाचा हक्क बजावला. या तरुण मतदरांमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
ऑक्टोबर 2025 मध्ये मतदरांची संख्या 6.41 कोटी होती. मात्र निवडणुक अयोगाच्या विशेष पडताळणीनंतर ही संख्या 5.73 कोटींवर आली आहे. 2021 मध्ये 6.29 कोटी मतदार होते. मतदारांची एकूण संख्या कमी झालेली असली तरी मतदनाची टक्केवारी 82% च्या वर गेल्याने हा आकडा 2021 च्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाची व्याप्ती मोठी असल्याचे दर्शवतो.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणुक आयोगाने 1.06 लाख बॅलेट युनिट्स 75, 064 कंट्रोल युनिट्स आणि तितकीच व्हीव्हीपॅट मशिन्स तैनात केली होती. सुरक्षेसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 300 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.



Comments