top of page

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हल्ला; गाडीची काचा उघड्या असत्या तर डोके फूटले असते , ममता बॅनर्जींचा दावा

कलकत्ता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीवर रविवारी जमावाकडून हल्ला करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूलचे काही नेते व पदाधिकार्‍यांवर अंडीफेकीच्या अनेक घटना घडल्या. त्यावर आता थेट ममतादिदींच्या गाडीवरच हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


ममता बॅनर्जी या रविवारी उत्तर 24 परगणामधील बिजपूर येथे गेल्या होत्या. पोलिस कोठडीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा अरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्या गेल्या होत्या. यादरम्यान रस्त्यातच आक्रमक झालेल्या जमावाने त्यांच्या गाडीला घेरले. आपल्या गाडीवर मोठे दगड, चिखल, चपला फेकण्यात आल्याचा दावा ममतांनी केला आहे.


दरम्यान, पोलिस कोठडीत तब्येत बिघडल्यानंतर कार्यकर्त्यांला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पोलिस कोठडीत त्याला मारहाण केल्याचा अरोप कुटुंबियांसह स्थानिकांकडून केला जात आहे. हा मुद्दा तृणमूल काँग्रेसनेही उचलून धरला आहे. त्यासाठी बॅनर्जी कार्यकर्त्याच्या घरी गेल्या होत्या.


स्थानिकांमध्ये पोलिसांविरोधात प्रचंड रोष असून त्याचा सामना ममतादीदींनाही करावा लागल्याचे वृत्त आहे. वातावरण बिघडण्यासाठी ममतादिदी आल्याचा दावा करत स्थानिकांनी त्यांना दौर्‍याला विरोध केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ममतादिदींनी हे आपल्याविरोधात षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना आम्ही आधिच दौर्‍याची माहिती दिली होती. पण त्यानंतर पुरेशी सुरक्षा तैनात करण्यात आली नाही. आमच्या गाडीच्या काच उघडी असती तर डोकं फुटलं असतं असा दावाही ममतादिदींनी केला आहे.


सत्ताधारी भाजपकडूनही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांच्या वाहनावर असा हल्ला करणे योग्या नाही. या घटनेमध्ये भाजपचा एकही कार्यकर्ता नव्हता. माजी महिला मुख्यमंत्र्यांसोबत अशी घटना घडणे, अनुचित आहे. अशा घटनांमुळे राज्याची प्रतिमा खराब होते. पोलिसांनी तात्काळ याबाबत कारवाई करावी

Comments


bottom of page