पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ फेल , टीएमसी खासदाराने जाहीपणे सांगितलं, ममता बॅनर्जींचा दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठकांचा धडाका
- Navnath Yewale
- 6 days ago
- 1 min read

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू आहेत. अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. तब्बल 58 आमदरांनी वेगळा गट स्थापन केला आहे. या सगळ्याच्या मागे पडद्यामागून भाजप ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा अरोप होत आहे. ममता बॅनर्जींचे एक एक खासदार फुटत असल्याचे सांगितले जात आहे.
टीएमसीची लोकसभेतील खासदारांची संख्या 28 आहे. मात्र, जर मोठा गट फूटून बाहेर पडला तरी त्याच्या मान्यतेसाठी ती संख्या दोन तृतीयांश असली पाहिजे. म्हणून जर 28 पैकी 19 खासदार फूटले तरच फुटीर गटाला मान्यता मिळेल अन्यथा ते अपात्र ठरतील.
यावरुन टीएकसीचे खासदार किर्ती आझाद यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सध्या तरी ऑपरेशन लोटस हे यशस्वी होताना दिसत नाही. भाविष्यात काय होईल हे माहीत नाही. मात्र, फुटणार्या सदस्यांची संख्या सध्या 16 च्या पुढे जात नाही. ते म्हणाले की, अमित शाहांच्या देखरेखीखाली ऑपरेशन लोटस जोरात सुरू आहे. वेगवेगळी नावे फूटत असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. मात्र, नक्कीच त्यांच्याकउे 16 नावं देखील नाहीत.
दरम्यान किर्ती आझाद यांनी आरोप केला आहे की, खासदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांच्या निवास्थानी,कार्यालयात पोलिस ठाण मांडून आहेत. ज्या खासदार फुटल्या डॉ. काकोली घोष यांच्यावरून त्यांनी अमित शाहांना देखील टोला लगावला. ज्या पाच लाख रुपये घेताना (नारद स्टिंग) कॅमेर्यात कैद झाल्या आहेत. त्याच तुमच्या भांगेतील उधाराचे सिंदूर आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
दुसरीकडे पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्याशी बैठकांचा धडका सुरू आहे. नुकतीच सोनिया गांधी यांच्यासी बंद दारा आड चर्चा, अभिषेक बॅनर्जी , राहुल गांधी यांच्यात चर्चा. दिल्लीतील बैठका आणि हालचालींचा परिनाम पश्चिम बंगालच्या राजकारणावर होताना दिसून येत आहे. निश्चितच ममता बॅनर्जी भाजपचा‘ ऑपरेशन लोटस’ चा डाव उधळून लावण्याच्या प्रयत्नांत असल्याने देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी भाजपचा डाव उधळून लावणार का? हे पाहावं लागणार आहे.



Comments