top of page

महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात शाब्दिक चकमक? , मुंबई भाजप अध्यक्षाच्या बैठकीतच दोन्ही पदाधिकार्‍यांत खडाजंगी

मुंबई: मुंबई महापालिकेतील भाजपच्या अंतर्गत बैठकीत दोन प्रमुख महिला नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. मुुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी बोलावलेल्या बैठकीत महापौर रितू तावउे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांच्यात यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा वाद अमित साटम यांच्या समोर झाल्याचे बोलले जात आहे.


महापालिकेतील पक्षाच्या कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी अमित साटम यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान काही मुद्यांवरून रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ शाब्दिक खडाजंगी झल्यानंतर अमित साटम यांनी हस्तक्षेप करत दोघींनाही समज दिल्याचे बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेत पदाधिकार्‍यांनी एकमेकांमध्ये स्पर्धा न करता समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना अमित साटम यांनी दिल्याची माहिती आहे. पक्षाच्या अंतर्गत मतभेदांचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होऊ नये,याबाबतही त्यांनी पदाधिकार्‍यांना बाजावले. ‘ स्वत:चे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा, अशा शब्दांत साटम यांनी पदाकिधार्‍यांना सूचना केल्याची माहिती आहे.


महापालिकेतील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी पघक्षाची प्रतिमा खराब होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असेही अमित साटम यांनी बैठकीत स्पष्ट केले. मुंबईकरांनी आपल्याला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.


या बैठकीस मुंबई महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्षा यांना साटम यांनी महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आहे. महापालिकेतील भाजपच्या सर्व पदाधिकार्‍यांमध्ये समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, महापालिकेतील भाजपच्या दोन प्रमुख महिला पदाधिकार्‍यांमध्ये पक्षाध्यक्षांसमोरच झालेल्या या खडाजंगीची चर्चा अता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांवर अमित साटम यांनी दिलेल्या सूचनांनंतर परिस्थिती कशी बदलते, याकडे लक्ष लागले आहे.

Comments


bottom of page