top of page

युद्घ पुन्हा सुरू होणार? इराणचा मित्र मैदानात अमेरिकेला धमकी; जगभरात खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र, तणाव अजूनही कायम आहे, इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मुज बंद करणत आला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढला आहे. अमेरिका आणि ईराणमध्ये युद्धविरामाच्या वाटाघाटाची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प योनी इराणला हदरवणारी धमकी दिली आहे. आता इराणला संपवण्याची वेळ आली आहे, आम्ही आता इराणचं काहीही ऐकून घेणार नाही, जर इराणने आमच्यासोबत सामंजस्य करार केला तर ठीक नाही तर आम्ही कडक कारवाई करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मात्र ट्रम्प यांच्या या धमकीनंतर आता तणाव आणखी वाढला आहे.


अमेरिका इराण युद्धामुध्ये पुन्हा एकदा हुती बंडखोरांची एन्ट्री झाली आहे. यमनच्या हुती बंडखोरांकडून पुन्हा एकदा बाब-अल-मंडेबची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम राष्ट्रांवरील आक्रमण थांबवावं, अन्यथा जर आम्ही बाब-अल-मंडेबीची सामुद्रधुनी बंद केली तर जगातील कोणतीही महाशक्ती पुन्हा या सामुद्रधुनीला खुलं करू शकणार नाही असा इशारा हुती प्रशासनाचे उप परराष्ट्रमंत्री हुसेन अल-एजी यांनी दिला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झालेली असताना इराणकडून पुन्हा होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आली, त्यानंतर आता थेट हुती बंडखोरांकडून धमकी देण्यात आली आहे.


दरम्यान, आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद आहे, त्यात आता जर पुन्हा बाब-अल-मंडेबची सामुद्रधुनी बंद झाली तर जागावर मोठं संकट निर्माण होऊ शकतं. जगातील हा एक सर्वात महत्वाचा व्यापारी मार्ग आहे. हा मार्ग बंद झाल्यास युरोपीयन राष्ट्र मोठ्या

संकटात सापडू शकतात.


हुसैन अल-एजी यांनी शनिवारी आपल्या ट्विटरवर या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे,त्यामध्ये त्यांनी म्हटले की, जर सनाने (यमनची राजधानी) बाब-अल-मंडेबची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला तर जगातील कोणतीच महाशक्ती पुन्हा हा रस्ता सुरू करू शकणार नाही. त्यामुळे अमेरिका आणि त्यांच्या सहकार्यासाठीच हेच योग्य राहील की त्यांनी आपली पाऊलं वेळीच रोखावीत, त्यांनी मुस्लिम राष्ट्रांच्या मतांचा आदर करावा, जगात शांतता ठेवावी असा इशाराही हुती बंडखोरांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला आहे.

Comments


bottom of page