top of page

चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठराला, दोन्ही देशाचे शिष्ठमंडळ चर्चेसाठी पाकिस्तानात दाखल


अमेरिका-इराण शस्तसंधी चर्चेसाठी अमेरिका आणि इारणची शिष्टमंडळे पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती जेडी व्हान्स करत आहेत. इराणी शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ करत आहेत. इराणी शिष्टमंडळात 71 जणांचा समावेश आहे.


पाकिस्तानचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा विश्वास आहे की, वाटाघाटीमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणे हे अमेरिकेचे प्रमुख प्राधान्य आहे. त्यांच्या मते, हे किमान अमेरिकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. अल जझीरशी बोलताना ते म्हणाले की, अणु निरीक्षकांना इराणच्या सुविधांना भेट देण्याची परवानगी मिळावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अख्तर यांच्या मते, इराण आपला अणु कार्यक्रम आणि क्षेपणास्तांचा साठा यांसाख्या महत्वाच्या मुद्यांवर आपली भूमिका बदलणार नाही. त्याचवेळी, लेबनॉन आणि येमेनमधील आपल्या मित्र राष्ट्रसंदर्भातील वाटाघाटींमध्ये इराण काही प्रमाणात नरमाई दाखवू शकतो. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांनंतरही इराणची स्थिती काही प्रमाणात मजबुत आहे आणि वेळी त्यांच्या बाजूने आहे. अख्तर यांच्या मते अमेरिकेवरील वेळेचा दबाव वाढत आहे.


पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींच्या ‘ बॅक-टू-बॅक’ भेटी झाल्या आहेत. पुढील काही तास जगासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण पाच दशकांनंतर अमेरिका- इराण पहिल्यांदाच थेट समोरासमोर बसण्याची शक्यता आहे. इस्त्रायल अडथळा आणत आहे, हे कारण देऊन अमेरिका आपली जबाबदारी टाळू शकत नाही, असा कडक संदेश इराणने दिला आहे. पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इरणला ‘ आमनेसामने’ बसवण्यासाठी मोठी ताकद लावत आहे. चर्चेच्या पहिल्या टप्प्यात इराणची अमेरिकेनं गाठवलेली मालमत्ता मुक्त करण्यास तयारी दर्शवली असल्याचे वृत्त आहे.


पाकिस्तानच मास्टर प्लॅन : पाकिस्तानचा असा प्रयत्न आहे की अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींनी एकाच टेबलवर बसून थेट चर्चा करावी, चर्चेची सुरुवात जे.डी. वन्स आणि माहेम्मद गालीबाफ यांच्यातील हस्तांदोलनाने व्हावी, अशी पाकिस्तानाची योजना आहेे. जर ते शक्य झाले नाही, तर पाकिस्तानी अधिकारी या दोघांमध्ये चर्चा सुरू करतील.


ही चर्चा आज (शनिवारी) भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत चालणार आहे. जर थेट चर्चा झाली, तर तो मोठा राजनैतिक विजय मानला जाईल. तसे न झाल्यास, चर्चा ‘ अप्रत्यक्ष’ (म्हणजे पाकिस्तानी अधिकारी निरोप घेऊन एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जातील) पद्धतीने होईल आणि ती आजच संपेल.


चर्चेपूर्वी महत्वाच्या भेटीगाठी: चर्चा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. शरीफ यांनी आधी इराणचे संसद अध्यक्ष गालीबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वन्स, स्टीव्ह विटकॉफ जारेड कुशनर यांची भेट घेतली. या भेटीवेळी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि गृहमंत्री मोहसीन नक्वी हे दखील उपस्थित होते.


इस्त्रायलचं नाव पुढे करू नका: या चर्चेदरम्यान इराणने एक अत्यंत महत्वाचा पावित्रा घेतला आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जर ही चर्चा अपयशी ठरली, तर त्याचे खापर केवळ इस्त्रायलवर फोडून अमेरिकेला मोकळे होता येणार नाही.

अमेरिका असा देखावा करण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला शांतता हवी आहे. पण इस्त्रायल अडथळे आणत आहे. इराणने हे स्पष्ट नाकारले असून त्यांच्या मते इस्त्रायल हे अमेरिकेच्या निर्णयानुसारच चालते. त्यामुळे चर्चेच्या अपयशाची सर्व जबाबदारी अमेरिकेचीच असेल अंसही इराणने स्पष्ट केले आहे.

Comments


bottom of page