5 कोटींची कॅश, 21 लाखांचं सोनं, 8लाखांची चादी, 4 रायफल, 2 पिस्तुलं आणि 500 जिवंत काडतूसे छत्रपती संभाजीनगरमध्ये तथाकथित ‘डॉन’ च्या घरी भल्या पहाटेच पोलिसांची छापेमारी
- Navnath Yewale
- 7 hours ago
- 1 min read

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि.10 जुलै) पहाटे केलेली कारवाई राज्यभरात प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. नव्वदच्या दशकात शहरात मोठी दहशत असलेल्या एका डॉनच्या घरीच पोलिसांनी पहाटेच धाड टाकली. या धाडीत पोलिसांच्या हाती लागलेल्या काही गोष्टींनी शहरात खळबळ उडाली आहे.
एकेकाळी छत्रपती संभाजीनगर शहरात डॉन फरजान यांची मोठी दहशत होती. त्यांचं गेल्या महिन्यात निधन झालं. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या विविध कलमांखाली अनेक छोटे- मोठ्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना छावणी पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका घरात मोठ्या प्रमाणावर रोकड आणि शस्त्रसाठा ठेवण्यात आल्याची खबर मिळाली होती. या मिळालेल्या खबरीची माहिती पोलिस आयुक्तांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं शनिवारी पहाटेच संबंधित घरावर छापा टाकला. छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत सातव यांनी छापेमारीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी डॉन बाबा फरजान याच्या घरी केलेल्या छापेमारीत 5 कोटींची रोकड, 21 लाखांचे सोन्याचे दागिने, 8 लाखांची चांदी, 4 रायफल, 2 पिस्तुले , सुमारे 500 जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज जप्त केला आहे.
तसेच पोलिसांना या कारवाईदरम्यान रोख रक्कम, सहा वेपन, तलवारी, चाकू, गुप्ती असे इतर शस्त्रसाठाही हाती लागला आहे. बाबा फरजान यांच्याविरोधात गुन्हे दाखल असल्यानं पोलिसांनी ही कारवाई करताना सावधगिरी बाळगल्याचंही, पोलिस अधिकारी सातव यांनी सांगितल. पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये घातपात घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेाकड, शस्त्रसाठा, लाखो रुपयांचे सोनं-चांदीचे दागिने आणि जिवंत काडतुसे कोठूमन आणण्यात आली. याचा पोलिस सखोल तपास करत आहेत.
छापेमारीत पोलिसांना हाती लागलेल्या शस्त्रांस्त्रांचा वापर यापूर्वी झाला आहे का, ते येथे साठवण्याचा हेतू काय होता, याबाबतचा सखोल तपास केला जात आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.10 जुलै) करण्यात आली आहे. त्याचदिवशी पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.



Comments