अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे शरद पवारांचा आमदार- भुजबळांचे गंभीर आरोप
- Navnath Yewale
- Sep 18
- 2 min read
रात्रीतून बैठका झाल्या, आणि गच्चीवर दगडं आणून ठेवले, सकाळी पोलिसांवर दगडफेक झाली, 84 पोलिस कर्मचारी ज्यामध्ये महिला कर्मचारीही होत्या दवाखाण्यात, त्यांच्यातल्याच बारस्कर महाराजांनी सांगितलं. जरांगेच्या व्यासपीठावर जाणार्यांना आम्ही निवडणूकीत धडा शिकवू, राष्ट्रवादीच्या चिंतनाच्या शिबीराच्या पूर्वसंध्येलाच समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळांचे पवारांवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते असल्याचा आरोप अनेक वेळा होत आहे. परंतु आता अंतरवाली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते अन् मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.
अंतरवाली सराटीमध्ये 2 सप्टेंबर 2023 रोजी पोलिसांकडून लाठीहल्ला झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे निघून गेले होते. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी त्यांना पुन्हा आणून बसवले, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. ते नागपूरात समता परिषदेच्या मेळाव्यात बोलत होते.
शुक्रवारी नागपूरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वसंध्येला येथे समता परिषदेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावरच हल्लाबोल केला. दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोनावर पालिसांनी लाठीहल्ला केला होता. या बैठकीत पवार यांचा एक आमदार उपस्थित होता. बैठकीत दगडफेकीचा डाव होता, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विद्यमान महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयावरही सडकून टीका केली.
भुजबळ म्हणाले या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला आहे, शासनाने तो एकतर मागे तरी घ्यावा किंवा त्यात सुधारणा तरी करावा, आरक्षणाचा आधारच सामाजिक मागासलेपणा आहे. पण त्याचा विचारच न करता सरकारने पावले उचचली आहे. जरांगेनी दोन वर्षापूर्वी 25 वेळा उपोषण केले त्यांचकडं कुणी लक्षही देत नव्हतं. उपोषणाला बसायचे आणि त्याचं तेच उठायचे. त्यांच्यातून वेगळं झालेल्या बारस्कर महाराजांनीच सांगितलं आहे. शरद पवारांच्या पक्षातीलएक आमदार यामध्ये होता. रात्रीतून बैठक झाली आणि गच्चीवर दगड आणून ठेवले. दुसर्या दिवसी सकाळी पोलिस आले की, पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिस घरात घुसत होते पण त्यांना घरातून लाथा घालून बाहेर ढकलण्यात आले. महिला पोलिस कर्मचार्यांसह 84 पोलिस कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाले त्यांना उपचारार्थ दवाखाण्यात नेण्यात आले. आजही दवाखाण्याचे रेकॉर्ड पहा. जरांगेच्या स्टेजवर जाऊन जे झुकले त्यांना आम्ही निवडणुकी धडा शिकवू असंही भुजबळ म्हणाले.


Comments