अखेर ठाकरे बंधूचे मनमिल; संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा
- Navnath Yewale
- Dec 24, 2025
- 3 min read

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अणि शिवसेना ठकारे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (दि.24) संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीच्या चर्चंना पूर्णविराम दिला. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाठी शपथ घेत सूचक इशारा दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले “ संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगलकलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला नाही. त्याच्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105,107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला निवडून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वभाविक आहे. कारण, आम्ही आज दोघं इथे बसलेलो आहेत.
पुढे ते म्हणाले, “ आमच्या दोघांचेही आजोबाच प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींपैकी एक सेनापती. त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजेच शिवेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होतं. त्यांच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नायायला लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म घ्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्षे होतील.”
“ इतकी वर्षे व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहत आहोत की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती. त्यांचेच दोन प्रतिनिधी वरती म्हणजे दिल्लीत बसलेले आहेत. त्यांचे मनसुबे आहे. आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काही संघर्ष ते जे काही हुतात्मा स्मारक आहे. त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत आणि मी मागेच म्हटलं. एकत्र आलो आहोत. ते एकत्र राहण्यासाठी.” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच युतीबाबत स्पष्ट मत मांडले.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, “ उत्साह आमाप आहे. मला कल्पना आहे की, आज केवळ महारष्ट्रच नाही तर अख्या देश बघतोय मी सर्वांना विनंती करतोय अवाहन करतोय आणि एक सूचना सुद्धा करतोय, कारण मागे विधानसभेच्या वेळेला भाजपने जो अपप्रचार केला होता. ‘बटेेंगे तो कटेंगे’ तसंच मी कराठी माणसांना सांगतोय, आता जर का ‘ चुकलात तर संपाल’ आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो.
“ यापुढे मुंबई आणि महारष्ट्रावर कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने मुंबईला महारष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत” असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधार्यांना दिला.
पुढे ते म्हणाले की,“ मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कुणाच्याा वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही. भाजपला काय हवं ते भाजपने पाहावं. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय हवं ते आम्ही पाहतो.” असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि रजा ठाकरे यांनी शिवतीर्थ येथील दिवंगत बाळासाहेब ठकारे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी रश्मी ठाकरे. शर्मिला ठाकरे, आमदार आदित्या ठकारे मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना आणि मनसेचे नेते, उपनेते, सचिन, खासदार आमदार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक,मनसैनिक यांची उपस्थित होती.
मागील काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांचा एक पॉडकॉस्ट प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी युतीचे संकेत दिले होते. त्या व्हायरल व्हिडिओचे उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थन करत त्यांनीही युतीबाबत सकारात्मक चिन्हे दर्शवली होती.
तेव्हापासूनच हे दोन्ही बंधू एकत्र कधी येणार याची चर्चा रंगली होती. अखेर वरळी येथे मराठी माणसांसाठी मराठीच्या मेळाव्यात ठकारे बंधू 20 वर्षानंतर एकत्र दिसले. त्यानंतर अनेक कौटुंबीक कार्यक्रमांत ठाकरे बंधू एकत्र आले होते. आता निवडणूकांच्या रणधुमाळीत ते एकत्र असणार का, याचे तर्क- वितर्क लावले जात असताना अखेर आज राज आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली.



Comments