अखेर रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केला सुपूर्द; राजीनामा स्विकारण्याची विनंती
- Navnath Yewale
- 3 hours ago
- 2 min read

मुंबई: कॅप्टन अशोक खरात प्रकरणी वादात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत अधिकृतपणे राजीनामा दिला आहे.
राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला आहे. पोलिस महासंचालकांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा देण्याचे चाकणकर यांना आदेश दिले. त्यानुसार चाकणकर यांनी देवगिरी बंगला गाठून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला.

रुपालीर चाकणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये महाराष्ट्र राज्य महिला अयोग पदाचा राजीनामा स्विकारण्यास सांगितलं आहे. मात्र यावेळी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, “ मी सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरिल विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला अयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणास सादर करत आहे. आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकार्यांची शतश: ऋणी आहे. भविष्यातही आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्ष, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे . धन्यवाद...!
मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचकांकडे चौकशीची मागणी : रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री भेटीनंतर एक्सपोस्टवर पोस्ट शेअर केली होती. आज मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेतली. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कठोर कारवाई व्हावी याबाबत त्यांना राज्य महिला अयोगाच्या वतीने पत्र दिले असं त्यांनी लिहीलं होतं.
कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही असा दावा त्यांनी केला आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला अयोगाच्या वतीने पत्र दिल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली होती. त्यांनी म्हटलं आहे की, “ शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्अ असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत मला कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पेालिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे असंही चाकणकर म्हणाल्या होत्या.



Comments