अजितदादांचा अपघात नाही, तर घातच !, रोहित पवारांचे पत्रकार परिषदेत सादरीकरण
- Navnath Yewale
- Feb 10
- 3 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती सादर केली आहे. रोहित पवार यांनी विमान अपघात आणि विमान कंपनीबद्दल धक्कादायक माहिती मुद्देसुद्दपणे सादर केली. रनवे 11, शेवटच्या एका मिनिटांचा सर्व डेटा गायब असे अनेक मुद्दे उपस्थित करत रोहित पवार यांनी तिघांवरप संशय व्यक्त केला. रोहित पवार यांनी डायरेक्ट नावंच जाहीर केली.
अजित पवार यांचा घातपात की अपघात असे प्रश्न सर्वांना पडले असताना आता आमदार रोहित पवार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. अजितदादांच्या विमानाची 100 टक्के घातपाताची शंका, आमदार रोहित पवारांनी अपघाताबाबत शंका व्यक्त केली. माझा काका गेला आहे. महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेला आहे. याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत रोहित पवारांनी इस्त्रायलची गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखला दिला. अशी कामं करण्यामध्ये इस्त्रायलचा एक एजंट कुशल होता. एखाद्या नेत्याला किंवा व्यक्तीला ठार करायचं असेल तर त्याच्या ड्रायव्हरला संपवा असं तो म्हणायचा. अजितदादांच्या अपघातासंबधी असाच काही प्रकार घडलाय का याचा तपास व्हावा अशी मागणी रेाहित पवारांनी यावेळी केली.
रनवे 29 नंतर 11 आणि शेवटचा एक मिनिट
8:36.38 एअरक्राप्ट ने गो अराऊंड करत असल्याचे सांगत रनवे 29 लेप्ट बेस जॉइन करत असल्याचे सांगितले. (रनवे 29 वर जर विमान उतरवले असते तर 8:37 ला दादा सुखरुप पोहचले असते) परंतु पुन्हा दकदा विमान रनवे 29 वर न उतरता रनवे 11 ची परवानगी मागितली. दोनदा रनवे 29 ची परवानगी मिळाली असताना रनवे 11 चा आग्रह विमानाने का केला? वास्तविक रनवे 29 ला टेबल टॉप नव्हत विमानाचा एजन्सी चुकला असता तरी विमान क्रॅस होण्याची शक्यता नव्हती. तसेच शेवटच्या एका मिनिटांतील सर्व डेटा गायब असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांनी जाहीर केलेली 3 नावे कोणती?
व्हिएसआर विमान कंपनी अॅरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट अशी 3 नावे रोहित पवार यांनी जाहीर केली. यांच्यांवर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत अॅरो नावाच्या कंपनीने व्हिएसआरचं विमान हायर केलं होतं. सकरारी जीआर नुसार घेतलं होतं. पवार नावाचा मुणुस अॅरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलीटी क्लिअर असल्याचं म्हटलं आहे. ही कंपनी बर्याच राज्यात काम करत आह. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे. रोहित पवार यांनी विमान कपंनीच्या मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याच्याविरोधात कारवाई केली जावी अशी मागणी केली. व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करणं धोकादायक, कंपनीचं विमान वापरण्यास आयोग्य असल्याचही रोहित पवारांनी म्हटलं. विमानात काही तांत्रीक, यांत्रिक अडचण निर्माण झाल्यास मेन परायलटने मे डे मे डे म्हणंन अपेक्षी असतं. पण कॉकपिटमध्ये क्रूमेंबर पाठक या ओ.. शिट.. म्हटलं मेन पायलट काहीच का बोलले नाहीत अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्लॅस्टीक बाटलीवरुन दादांना शंका : अजितदादांना काही बर्या वाईटाची शंका होती का? ते नेहमी प्लॅस्टीक बॉटलमध्ये पाणी पित असत. मात्र अलिकडे अजितदादांनी प्लॅस्टीक बॉटल ऐवजी काचेच्या बाटलीची निवड केली होती. सोबत त्यांचे विश्वासू अंगरक्षकच असत. पिण्याच्या पाण्याची बॉटल बदलण्यामागे अजितदादांना काही शंका असावी.
विमानाबाबत दादा कायम म्हणाले: विमान प्रवासाबाबत दादांनी शंका उपस्थित केल्याचंही रोहित पवार म्हणाले, माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतल्याचे मी दादांना सांगितले तेव्हा दादा म्हणाले तु हेच हेलिकॉप्टर वापर, विमान प्रवासांच आता खूप कठीण झालंय असे म्हणाले शिवाय त्यांच्या एका मित्राला त्यांनी विमान खरेदीचा सल्ला दिला होता. विश्वासू व्यक्तीचं विमान असलं पाहिजे दादांना वाटत होते.
सुनेत्रा काकींची इच्छा नसताना...
अजितदादांच्या अपघातानंतर काही तासांत काकींची इच्छा नसताना त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. आम्हा पवार कुटुंबीयांसाठी अजितदादांच्या अपघाताचा तपास महत्वाचा आहे. राजकारण्यांना काय अपेक्षीत आहे ते तुम्ही गेल्या तेरा दिवसांत अनुभवलं असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुखांकडे बोट दाखवले.
बाहेर देशातील कंपनीकडून तपास व्हावा: अपघात होवून तेरा दिवस लोटले असले तरी सरकारने स्थापन केलेल्या तपास एजन्सीने (सीआयडी) अद्याप केवळ बारामती विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. मुळात सीआयडीला विमानातील यांत्रिक- तांत्रिक माहिती काय आहे? सखोल तपासाठी अमेरिका, कॅनडा, फ्रांस, अफ्रिका या देशातील एजन्सीजमार्फत तपासाची आमची मागणी आहे.
पवार साहेबांना परिणामाची जाणिव: अजित दादांच्या अपघातावर शरद पवार यांनी हा अपघात असल्याचं म्हटलं होतं, यावर रोहित पवार म्हणाले की अजितदादांचा अपघात झाल्यानंतर अवघ्या सात तासानंतर पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलं होतं. घटडल्यानंतर अवघ्या सात तासात काय माहिती मिळणार का? याशिवाय दूसर्या दिवशी लाखो लोक तिथे जमाणार होते जबाबदार व्यक्तीने काही शंकायुक्त काही स्टेटमेंट दिले असते तर तिथे लोकांची काय परिस्थिती राहीली असती. जबाबदारी आणि परिस्थितीचं भान असणारं देशाचं नेतृत्व आहे, ठोस माहिती अभावी पवार साहेबांनी ते स्टेटमेंट दिलं असल्याचं रोहित पवार म्हणाले.



Comments