अजितदादांच्या बीडच्या सभेला स्टार प्रचारकाची दांडी !
- Navnath Yewale
- Nov 25
- 1 min read
परळी, धनंजय मुंडे नावं टाळले, चर्चेला उधान

बीड: नगरपालिकांच्या निवडणुक प्रचारार्थ जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची धडका सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.
बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसर्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळलने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवारांनी अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई आणि बीड या तालुक्यांमध्ये सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले. याच सभेत अजित पवारांनी बीडमध्ये 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. भ्रष्टाचार करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कणकवलीत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेल पोहोचला आहे. जिथे निलेश राणे यांनी पोलिसांच्या कायपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पंकजा मुंडे यांनी सध्या राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे आणि चांगल्या पिढी घडवण्यावर भर देणार असल्याचे म्हटले.
बीडमध्ये अजित पवारांच्या सभेला पक्षाचे स्टार प्रचारकाची अनुपस्थितीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे. अजित पवारांनी आमदार धनंजय मुंडे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती. त्यानंतर अजित पवारांवर सामाजिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. शिवाय स्वपक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून आमदार धनंजय मुंडे यांच्या नियुक्ती बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातच आता अजित पवारांनी परळी आणि धनंजय मुंडे यांचे नाव टाळल्याने चर्चेला बळ मिळाले आहे.



Comments