अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी, अनेक पुरावे मिळाले आहेत सीआयडीची पत्रकार परिषदेत माहिती
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

पुणे : अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अत्यंत योग्य दिशेने प्रोफेशनल पद्धतीने सुरू असल्याचं सीआयडीने सांगितलं आहे. पहिल्या दिवसापासून प्रोफशनल पद्धतीने तपास सुरू आहे. या आकस्मित मृत्यूमागे घातपात आहे का हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे गुन्हेगारी कट आहे का याचा देखील तपास होत असल्याची माहिती सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अतापर्यंत सुरू असलेल्या तपासाची दिशा आणि वेग याबद्दल माहिती दिली.
बारामतीतील 28 जानेवारीच्या विमान अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतरांच्या अक्समात मृत्यूचा तपास 194 अंतर्गत सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. रोहित पवार यांच्या एफआयआर दाखल करण्याची मागणी केल्या नंतर आज सीआयडीने पत्रकार परिषद घेवून तपासाबाबत खुलासा केला आहे.
व्हीएसआर कंपनीवर डीजीसीए कडून कारवाई करण्यात आली आहे. तुमच्यातपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का? या प्रश्नावर सुनिल रामानंद म्हणाले की, तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे आणि आमचा सीआयडीचा तपास हा आकस्मित मृत्यूबद्दल आहे. आमच्यातपासात काही पुरावे मिळाले आहेत. एएआयबी चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल. एएआयबी चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निष्कर्ष काढला जाईल.
कट किंवा गुन्हेागरी कृत्य असल्याचं निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करून उर्वरित तपास पूर्ण करून न्यायालयात अभियोग चालवण्याची तजवीत ठेवली आहे अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
रोहित पवारांशी चर्चा: ‘ दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक अहवाल आला, 24 फेब्रूवारीचा हा अहवाल असून, बुधवार (दि.25) ला पदाकिधारी समर्थकांसह मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो होतो. पण काहींनी शंका उपस्थित करत, मी मुंबईला एफआयआरकरू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. झिरो एफआयआर कॉन्सेप्ट अंतर्गत एफआयआर दाखल करता येऊ शकतो. मुंबईत हे शक्य होतं पण ते स्वीकारलं नाही, म्हणून आज आम्ही बारामती पोलिस स्टेशनला आलोय, असं रोहित पवारांनी सांगितलं आहे. डिजीसीए रिपोर्टनुसारच व्हीएसआर विमान कंपनीवर ठपका ठेवला गेल्याचे सांगत आम्ही एफआयआर दाखल करण्याचा आग्रह धरतोय असंही ते म्हणाले. ‘दादा ज्या विमानानं बारामतील गेले ते लेअर जेट प्रकारातलं होतं, हे विमान योग्य स्थितीत नसतानाही अजित दादांना खराब असलेलं विमान का दिलं? असा आमचा सवाल हे म्हणूनच आम्ही या गलथान कारभाराला जाबाबदार असलेल्या व्हिएसआर कंपनीच्या अधिकार्यांविरोधात एफआयआर दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे,हाच मुद्दा त्यांनी सातत्यानं उपस्थित केला.



Comments