top of page

अजितदादांना मुंबईत रोखून धरलेल्या फाईलची माहिती समोर? आमदार रोहित पवारांची माहिती खरी ठरली !

मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवारांच्या विमान अपघरातावरून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. पवार कुटुंबातून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीच घातपाताचा संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहे. अपघाताच्या आदल्या दिवशी अजितदादांनी एका फाईलीवर सही केली होती. आता ती फाईल कोणती होतीयाची माहिती समोर आली आहे. भंडारा-गोंदियातील राईस मिलची ती फाईल असल्याची माहिती समोर आली आहे.


राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अनेक शंका उपस्थित केल्या होत्या अपघाताच्या आदल्या दिवशी मुंबईतील बैठका आणि भेटीगाठीमुळे अजित पवारांना बारामतीला जाण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेचं त्यांनी खासगी विमानानं जाण्याचा निर्णय घेतला होता.

पूर्व विदर्भातील एक नेता फाईलवर सही करण्यासाठी अडून बसला होता. ती फाईल आणेपर्यंत बराच वेळ गेला. उशीर झाल्याने अजित पवार दुसर्‍या दिवशी विमानाने गेले, असा दावा मंगळवारी रोहित पवारांनी केला होता.


अजित पवारांनी शेवटची सही कोणत्या फाईलवर केली ही माहिती आता समोर आली आहे. भंडारा-गोंदियातील राईस मिलच्या फाईलवर अजित पवारांनी शेवटची सही केली, या फाईलवर सही करण्यासाठी अजित पवार हे मुंबईत उशिरापर्यंत थांबले होते, आता या फाईलीवर अजितदादांना सही करण्यासाठी का थांबवण्यात आलं होतं, याचं कारण अद्याप समोर आलं नाही.


रोहित पवारांचे आरोप :

27 जानेवारी रोजी वेळापत्रकानुसार, अजितदादा संध्याकाळी मुंबईहून गडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत, त्यामुळे दुसर्‍या दिवशीचं विमान 27 तारखेला बूक केलं होतं. अपघाताच्या आदल्या दिवशी पूर्व विदर्भाच्या त्यांच्याच पक्षाचा एका बड्या नेत्याने दादांना एका फाईलवर सही करण्यासाठी आग्रह केला होता. हा नेता दादांना भेटायला येणार होता. पण तो यायला खूपच उशीर झाला. ती फाईल घरी होती आणि मंत्रालयात येण्यासाठी वेळ लागला. दादांचा त्यामध्ये बराच वेळ गेला. हे जर तपासायचं असेल तर दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नव्हते. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलवर सही केली. त्यामुळे वेळ गेला. त्यामुळे कारने जाणार्‍या दादांनी दुसर्‍या दिवशी सकाळी विमानाने जायचं ठरवलं. यामागे काही नियोजन होतं का हे तपासण्याची गरज आहे. अशी मागणी रोहित पवारांनी केली होती.

Comments


bottom of page