top of page

अतिवृष्टीची नुकसान भरपाई, मनरेगाच्या कामात भेदभाव करू नका

आष्टी मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेणे कोण्या एका नेत्याचे बाहुले बनू नये - माजी आमदार धोंडे, आजबे यांचा इशारा

मतदारसंघात कायदा सुव्यवस्था ढासळली; हल्ले करणार्‍यांवर गुन्हे दाखल होत नाहीत -भाऊसाहेब लटपटेचा आरोप


आष्टी विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत  मीळाली नाही. आणि मनरेगांतर्गत  कामांत शासकीय अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून भेदभाव केला जात आहे.हा भेदभाव कोणाच्यातरी  सांगण्यावर होत  आहे.सत्ताधारी  लोकप्रतिनिधींनी भेदभाव करू नये. आष्टी,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणा एका नेत्याचे बाहुले बनु नये अन्यथा मोठे आंदोलन करू असा माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सज्जड इशारा दिला आहे. तसेच आष्टी विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.अनेक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ले होत आहेत.हे हल्ले कोणाचे कार्यकर्ते करीत आहेत? कोणाच्या सांगण्यावर करीत आहेत ? हेही जनतेला माहीत असून पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे   आरोपीवर गुन्हे दाखल होत नाहीत. त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्याकडे मतदार संघातील विविध प्रश्न व हल्लेखोरावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी लवकरच  शिष्टमंडळ  घेऊन भेटणार आहोत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी आक्रमक पद्धतीने भाषण करून सांगितले.


 आष्टी तहसील कार्यालया समोर माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली  मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे  माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह भव्य धरणे आंदोलन केले. मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत आक्रमक पवित्रा घेतला.


गेल्या काही महिन्यांपूर्वी आष्टी विधानसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती.यामध्ये रस्ते,बंधारे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले.शासन दरबारी या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात  मदत पडलेली नाही. "पंचनामे झाले,पण पैसा कुठे आहे?" असा सवाल उपस्थित करत दोन्ही माजी आमदारांनी  प्रशासनाचा निषेध केला. अतिवृष्टीच्या मदतीसोबतच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभाची अनेक कामे प्रशासकीय पातळीवर अडकून पडली आहेत. विशेषतः ज्या विहिरींचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले होते, त्यांची मान्यता अचानक रद्द करण्यात आली आहे. या विहिरींना पुन्हा तातडीने मान्यता देऊन कामे सुरू करण्याची मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.खराब झालेले रस्ते आणि बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी.मनरेगा अंतर्गत रखडलेली वैयक्तिक व सार्वजनिक कामे सुरू करावीत. जिओ टॅगिंग होऊन रद्द झालेल्या विहिरींना पुन्हा प्रशासकीय मान्यता द्यावी.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आष्टी तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,पाटोदा तालुकाध्यक्ष दीपकदादा घुमरे,शिरूर कासार तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे,माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथदादा वनवे,माजी शिक्षण सभापती नियमत बेग, युवा नेते अजयराजे धोंडे, युवा नेते अभयराजे धोंडे, युवा नेते धैर्यशील थोरवे, युवा नेते यशभैय्या आजबे,युवा नेते महेश आजबे,ॲड. भाऊसाहेब लटपटे, आरपीआय आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, नामदेव शेळके,शेख अस्ताक भाई,श्याम भैय्या हुले, आदिनाथ बेलेकर, दिलीपराव काळे, अशोक खेळकर, ॲड.रत्नदीप निकाळजे,ॲड. संभाजी दहातोंडे , राजपाल शेंडगे, संभाजी जगताप, बबनराव औटे, अभिलाष गाडेकर पाटील,गोकुळ सवासे,गणेश मोहोळकर,दिगंबर नाईकनवरे,आनंद घुमरे,कृष्णा मिसाळ, आदेश निमोणकर, संभाजी जगताप, पांडुरंग गावडे, अनिल बडे,उद्धव शिरसाठ,जालिंदर गायकवाड नेते,बाबा ससाणे,गौतम ससाणे,हरिभाऊ जंजिरे,सुदाम काका झिंजुर्के, बजरंग कर्डिले,अंकुशराव मुंडे,वैभव बडे,शेख नइम,राहुल शेळके, फजल शेख,शेख हादी,सनी काळपुंड, नितीन निकाळजे, सदाशिव दिंडे, सुनिल शिंदे,केदार जगताप,वसीम शेख,सावळेराम जायभाये,अशोक खेडकर,बापूराव जाधव,झुंबर चव्हाण,जालिंदर देवकर,सरपंच भरत जाधव,सरपंच माऊली वाघ, सरपंच संजयदादा विधाते,माऊली वाघ,बापूराव आव्हाड,संजय नालकोल,हरिभाऊ दहातोंडे,डॉ.सुनील गाडे,ताराचंद कानडे,डॉ.संतोष कदम,संजय चंदनशिव,बबनराव काकडे,चंद्रशेखर साके आदी मान्यवर उपस्थित होते.


 बीडिओसाहेब तुम्ही राजकीय दवाखाली येऊन आमच्या समर्थकांच्या वैयक्तिक लाभाचे तसेच रस्ते, शेततलावाचे, विहिरी,एमआरईजीएसची कामे आडवू  नका.भेदभावाचे काम करू नका. तुम्ही शासकीय अधिकारी आहात हे विसरू नका.असे दोन्ही माजी आमदाराने आक्रमक भाषाशैलीत सांगितले.धरणे आंदोलन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी गोकुळ बागलाने, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता शिनगारे हे आले होते.आपल्या सर्व मागण्यांचा विचार करून तात्काळ प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले.

आमदार सुरेश धस यांचा पलटवार


आष्टीमध्ये दोन्ही माजी आमदारांच्या आदोलनावर आमदार धस यांनी जोदार पलटवार केला आहे. आपल्या फेसबुक आकाऊंटवर पोस्टद्वारे आमदार धस प्रतिक्रिया दिली आहे की, आज आष्टी मध्ये दोन माजी आमदारांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले.. (ते फक्त एक तासाभरता ऊरकुन पणे घेतलं..) गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुद्धा मतदार संघातील जनतेने सपशेल काना डोळा केला. आष्टी तालुक्यातील सप्टेंबर 2025 मध्ये तुफान पाऊस पडला. अतिवृष्टी ने जमीन खनुन गेली. बंधारे वाहून गेले. नदीचा प्रवाह ही बदलला... सगळं होत्याचं नव्हतं झालं... सप्टेंबर पासुन आज जानेवारी पर्यंत प्रशासना ने काही प्रमाणात डागडुजी हि केली.. नाही असं नाही.. आता जवळपास सर्वच नदीपात्र कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. पाणी एकदम कमी झाले आहे. तर सप्टेंबर पासुन हे दोन माजी आमदार झोपले होते का..? पालकमंत्री हि यांचा अन् हे रुमणे पालकमंत्री विरोधात धरणे आंदोलन ला बसलेत..



या दोन्ही माजी आमदरांना जनतेचं काही देणंघेण नाही.. यांना फक्त आल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे धरणे घेऊन एक तासभर बसले.. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे रिकामे उद्योग सुरू केलेत यांनी जनतेतून सहानुभूती मिळविण्यासाठी हा खटाटोप असल्याचा पलटवारही आमदार धस यांनी केला.


Comments


bottom of page