top of page

अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार?, थेट फायटर जेटचं उड्डाण; ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जगभरात खळबळ

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर कारवाई केली, व्हेनेझुएलावर हल्ला करून ट्रम्प सरकारने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केलं आहे. अमेरिकेनं व्हेनेएझुएलावर केलेल्या हल्ल्याचा चीनकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर आता अमेरिकेनं मोठं पाऊल उचललं आहे.ज्यामुळे चीनची चिंता वाढली आहे. अमेरिकेनं आता थेट त्यांचे अणुउर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात उतरवलं आहे. या विमानावरून एफ- 35 सी स्टेल्थ फाइटर जेट्सनं उड्डाण देखील घेतलं आहे. हे रुटीन पेट्रोलिंग असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे . मात्र ही रुटीन पेट्रोलिंग नसून हा अमेरिकेनं चीनला दिलेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.


बुधवारी अमेरिकेच्या नौदलाकडून छायाचित्र जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये अणुऊर्जेवर चालारे विमानवाहू जहाज यूएसएस अब्राहम लिंकन दक्षिण चीनी समुद्रात ऑपरेशन करत असल्याचं दिसून येत आहे. आम्ही दक्षिण चीनी समुद्रात विमानवाहू जहाज तैनात केलं आहे कारण याचा मुख्य उद्देश हा या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ न देणं तसेच मित्र सैन्यांचा ताळमेळ ठेवणे हा आहे, असं स्पष्टीकरण अमेरिकेच्या सैन्यदलाकडून देण्यात आलं आहे.


दक्षिण चीनी समुद्रावरुन चीनचे आपल्या शेजारी असलेल्या अनेक देशांसोबत वाद सुरू आहेत. चीनकडून या समुद्राच्या मोठ्या भागावर दावा करण्यात आला आहे. चीनचा या समुद्रावरून फिलिपाईन्ससोबत देखील वाद सुरू आहे. विशेष म्हणजे फिलिपाईन्स हा अमेरिकेचा संरक्षण क्षेक्षातील प्रमुख भागीदार देश आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेनं उचलेलं हे पाऊल धोकादायक मानलं जात आहे. चीनकडे जगातील सार्वात मोठं नौदल आहे.


दरम्यान, चीनकडून अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. निकोलस मादुरो यांची आणि त्यांच्या पत्नीची सुटका करावी अशी मागणी चीनने केली होती. त्यानंतर आता अमेरिकेनं हे पाऊल चललं आहे. मात्र यावर अद्याप चीनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Comments


bottom of page