अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यावर येणार!
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेच्या टॅरिफवरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, संबंधाबाबत एक महत्वाचा संकेत समोर आला आहे. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी अलिकडेच दिलेल्या विधानामुळे द्विपक्षीय संबंधासाठी नवीन आशा निर्माण झाल्या आहेत. त्यांनी असेही संकेत दिले की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील एक ते दोन वर्षात भारत दौर्यावर येऊ शकतात. राजनैतिक वर्तुळात, हे भविष्यातील मोठ्या घडामोडींची पूर्वसूचना म्हणून जात आहे, जे दोन्ही देशांमधील संबंधांना एक नवीन दिशा देऊ शकतात.
सर्जियो गोर म्हणाले की, भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून काम करणे हा त्यांच्यासाठी एक अतिशय खास अनुभव आहे. त्यांनी भारताची विविधता, लोकशाही मूल्ये आणि जागतिक भूमिकेची प्रशंसा केली. गोर यांच्या मते, भारत आणि अमेरिकेतील संबंध केवह राजनैतिक नसून ते सामायिक मूल्ये आणि परस्पर विश्वासावर आधारित आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे मुख्य ध्येय दोन्ही देशांमधील संवाद अधिक मजबूत करणे आणि सहकार्याचे नवीन मार्ग उघडपणे आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आता पारंपारिक भागीदारींपेक्षा पुढे सरकली आहे, असे राजदूत गोर यांनी सांगितले संरक्षण, तत्रज्ञाण, व्यापार, हवामान आणि इंडो-पॅसिफिक यासारख्या क्षेत्रात सहकार्य सातत्याने वाढत आहे. त्यांनी याला“ पुढील टप्प्यातील भागीदारी” असे वर्णन केले, जिथे दोन्ही देश जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देत आहेत. हे संबंध आता केवळ द्विपक्षीय नाही तर जागतिक स्थिरता आणि सुरक्षिततेशी देखील जोडलेले आहेत.
सर्जियो गोर यांच्या मते, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील एक ते दोन वर्षात भारताला भेट देण्याची शक्यता आहे. त्यांनी ही भेट भारत-अमेरिका संबंधासाठी अत्यंत महत्वाची असल्याचे वर्णन केले. असे मानले जाते की, या भेटीदरम्यान संरक्षण करार, व्यापार करार आणि धोरणात्मक सहकार्याबाबत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. ट्रम्प यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय विश्वास आणि जागतिक भागीदारी आणखी मजबूत होऊ शकते.
राजदूत गोर यांनी पुनरुच्चार केला की, अमेरिकेला भारतासोबत दिर्घकालीन आणि मजबूत संबंध हवे आहेत. भाविष्यात तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर, सरंक्षण उत्पादन आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात सहाकार्य वाढेल, असे त्यांनी सांगितले. अमेरिका भारताला जागतिक स्तरावर एक महत्वाचा भागीदार मानते आणि त्याच्यासोबत जवळून काम करण्याचा प्रयत्न करते. ही भागीदारी केवळ दोन्ही देशांसाठीच नाही तर संपूर्ण जागासाठी महत्वाची ठरू शकते.



Comments