top of page

..आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा, मराठी माणसांचं हित आम्ही पाहू - मंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर: ठाकरे बंधूच्या युतीची घोषणे नंंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, एवढ नव्हे तर भाजपकडूनही सावध पावित्रा घेत ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका टाळण्यात येत असतानाच आता शिंदे गटाकडून मात्र टीका केली जात आहे. मुंबईवर तीस वर्षे तुमचीच सत्ता होती. आडीच वर्षे राज्यात होती, त्यावेळेस कुठे गेला होता मराठी माणुस. आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा मराठी माणसाचं हित पाहण्यासाठी आम्ही आहेत अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.


शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्रा पेक्षा कुठचे भांडण मोठे नसल्याचे राज ठाकरे म्हणाले तर उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत असल्याची शपथ घेत ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.


दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीने शिवसेना- मनसे पक्षातील नेते, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून स्वागत करण्यात येत आहे. याशिवाय भाजप कडूनही ठकारे बंधूंच्या युतीवर टीका टाळण्यात येत आहे. मात्र, शिवसेना फूटीपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे मंत्री म्हणून सत्तेत असलेल्या संजय शिरसाट यांनी आज ठाकरे बंधूच्या युतीवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे सोशल मिडियावर संजय शिरसाट यांना चांगलेच ट्रोल व्हावे लागले. माध्यमांशी बोलाताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, मुंबईवर तीस वर्षापासून तुमचीच सत्ता होती, तेव्हा मराठी माणुस कुठे गेला होता.


राज्यातही आडीच वर्षे तुमचीच सत्ता होती. आता तुम्ही तुमचा स्वार्थ पहा, मराठी माणसांचा स्वार्थ पाहण्यासाठी आम्ही आहोत असंही मंत्री शिरसाट म्हणाले. मात्र, मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्यावरून नेटकर्‍यांनी मंत्री शिरसाट यांना चांगलेच ट्रोल केले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्या सोबत सत्तेत होतात अशा कमेंटचा सोशल मिडियावर पाऊस पडत आहे.


Comments


bottom of page