top of page

आमंच 16 टक्के त्यांना देऊन शरद पवारांनी आमचं वाटोळच केलं, पण यांना त्यांच्या उपकाराचीही जानिव- जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

ree

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे ओबीसी समाजाच्या चिंता वाढल्या आहेत. याच मुद्यावरून काँग्रसचे नेते आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.


एकाच समाजाला सर्व काही पाहिजे. ईडब्ल्यूएस पाहिजे, ओबीसी पाहिजे आणि एसईबीसीमधून पाहिजेत. त्यांना सारथी-मधून फायदा पाहिजे, महाज्योतीमधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी जगायचे का नाही? जरांगे पाटील यांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना तुझ्या ताकदीच्या भरवशावर समुद्रात बुडवून मारून टाकोव. ही जी सत्तेची दादागिरी आहे, ती बरोबर नाही. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती. आता यावर मनोज जरांगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली, विजय वडेट्टीवार यांच्या विधानाबद्दल विचारणा केली असता. ओबीसी 374 जाती नेमक्या कोणी संपवल्या याबद्दल चिंतन करा. ओबीसी समाजाच्या लोकांनी यावर चिंतन करायला हवं. ओबीसींना यांनी आमचे मराठ्यांचे 16 टक्के आंरक्षण दिले. ओबीसींचा घात हा येवल्याच्या अलिबाबाने आणि आता वड्डेटीवार आणि पूवीृ त्यांचे जे कोणी नेते होते, त्यांनी केला आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.


मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण ओबीसींना दिले. हे पक्क झालं होतं. मग 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांचं आहे, हे मराठ्यांच्या नावावर आहे, हे माहिती असतानाही दिले, याचा अर्थ ओबसीची खरी फसवणूक वाटोळे कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानेच ओबीसीला उद्धवस्त केले आहे. कारण आमचं आरक्षण 16 टक्के आम्हाला मिळणार आहे. ज्यांनी दिलं त्याचे यांना उपकार नाही. आमचं तर दिलंच आहे. देणार्‍यांनी आमचे वाटोळे केले. ज्यांनी 1994 ला 16 टक्के आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी... त्यांनी आमचं वाटोळं केलंच समजा. पण त्याच पवारांचेही उपकार यांनी ठेवले नाहीत, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.


ओबीसी आरक्षण मोर्चाबाबत जरांगे पाटील म्हणाले की, मोर्चा काढू द्या, काय होते, आतापर्यंत 16 टक्के आरक्षण मराठ्यांचे खाल्ले आहे. ते म्हणतील तसं होणार नाही. हैदराबाद गॅझेट जीआर काढलेला आहे. आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलली आहे. कितीही बालू द्या धक्का लागणार नाही. एक खंत आहे त्यांना काहीही बधितले जात नाही. मात्र मराठ्यांना नियमात असून देखील संघर्ष कराव लागत आहे. सगळे पुरावे असताना आम्हाला त्रास दिला जात असतल्याचंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Comments


bottom of page