आमचा एकनाथ शिंदेंना पूर्ण पाठिंबा, एक नंबरचा माणुस दोन नंबरवर आलाय ; जयंत पाटलांच्या एकनाथ शिंदे समोरच कोपरखळ्या !
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नागपूर: विधानसभेत आजचा दिवस राजकीय आरोप- प्रत्यारोपांनी चांगलाच तापला. महायुतीत नगरपालिकेच्या निवडणुकांंदरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. आता वाद पुन्हा एकदा विधानसभेत गाजला. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच अनेक मुद्यांना हात घालत चांगलीच टोलेबाजी केली.
लाडकी बहीण योजना राबवताना सुरुवातीच्या काळात ई-केवायसी करणं गजेचं होतं. अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी वेळेत न झाल्यानं किंवा चुकीची नोंद भरल्यानं योजना बिघडल्याचा आरोप जयंतपाटील यांनी केला. ई-केवायसी न केलेल्यांवर किंवा चुकीची माहिती देणार्यांवर सरकार गुन्हे दाखल करणार का, असा कठोर प्रश्नही त्यांनी केला. याच वेळी त्यांनी आमचा शिंदेना कायम पाठिंबा असल्याचंही नमूद केलं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पाहून, “ आमचा एकनाथ शिंदेंना पाठिंबाच आहे. काय प्रॉब्लेम नाही ना ” असा टोला लगावल्याने सभागृहात हश्या पिकला.
पाटील यांचं म्हणणं होतं की, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर राज्य सरकारला त्याचा राजकीय फायदा झाला. पाटील पुढे म्हणाले की, ‘ या लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकार येण्यात फायदा झालाच, पण एक नंबरचा आमचा माणुस दोन नंबरला जाऊन बसला हा महाराष्ट्राचा मोठो तोटा झालेला आहे. त्यामुळे ई-केवायसी व्यवस्थित झालेलं नाही यासाठी तेव्हा पासूनच्या ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरला पाहिजे. पण या योनाचं श्रेय ज्यांच्या वाट्याला जायला हवं होतं, त्यांना बाजूला सारण्यात आलं. त्यामुळे ज्यांच्या हातात योजना होती, त्यांची जबाबदारी नीट तपासली पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. ते तुम्हाला सारखं समजून सांगत आहेत. काही हरकत नाही. पण एक नंबर हा एक नंबरच असतो, असं सांगत त्यांनी काही व्यक्तींवर अप्रत्यक्ष टोमनेही मारले. ज्या व्यक्तीने योजना ज्या माणसाने ही योजना आणण्याचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आम्हाला वाटायला लागलं आहे.
दरम्यान शंभुराजे देसाई यांनी एक नंबर-दोन नंबरच्या राजकारणावर भाष्य करताना काही वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, आज एक नंबरची व्यक्ती इथे नाही म्हणून असे बोलले जात आहे. जर दोन नंबरचा माणूस पुढील पाच वर्षात पहिल्या क्रमांकावर जाणार असेल, तर ते उघडपणे जाहीर करावं, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.



Comments