आमदार संग्राम जगतापाच्या वक्तव्यावर अजित पवार नाराज!
- Navnath Yewale
- Oct 11
- 1 min read
मुस्लिमविरोधी भूमिके विषयी कारणे दाखवा नोटीस बजावणार; वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवारांचा दम

मुंबई: राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम समूदायाच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानंतर त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. संग्राम जगतापांची भूमिका चुकीची आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. पक्षाच्या विचारधारेच्या वेगळी भूमिका मान्य नसल्याचंही ते म्हणाले. दिवाळीची खरेदी फक्त हिंदू बांधवांकडूनच करा असं वादग्रस्त आवाहन राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलं होतं. संग्राम जगताप यांनी या अधीही अनेकदा मुस्लिम विरोधी भूमिका घेतली होती. त्यावर अजित पवारांनी या आधीही समज दिली होती. त्यानंतर आताही तशाच प्रकारचं वक्तव्य जगतापांनी केलं.
सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की, दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत.
गेल्शस कसही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याचं दिसत आहे. त्यातून ते सातत्याने मुस्लिम विरोधी वक्तव्य करताना दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेकजण त्यांच्यावर नाराज आहेत.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही नाराजी अजित पवारांपर्यंत पोहोचवली आहे. अजित पवारांनीही संग्राम जगताप यांना वेळोवेळी समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र, जगताप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चामध्ये बोलताना त्यांनी मुस्लिम विरोधी वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजही नाराज झाल्याचं दिसून येतंय.
संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी जरी कारवाई केली तरी जगतापांना भाजपची वाट मोकळी असल्याचं चित्र आहे. कदाचित त्यामुळेच संग्राम जगताप हे उघड-उघड हिंदुत्वादी भूमिका घेताना दिसत आहेत. अशी राजकीय चर्चा सध्या सुरू आहे. पक्षाच्या विचारसरणीचविरोधात कोणत्याही आमदार-खासदाराने भूमिका घेतल्यात ती मान्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यामुळे संग्राम जगतापांवर आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल.



Comments